जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Latur Bank Robbery : ‘या’ जिल्ह्यातील ग्रामीण बँकेत जबरी चोरी, 50 लाखांच्यावर मुद्देमाल केला लंपास

Latur Bank Robbery : ‘या’ जिल्ह्यातील ग्रामीण बँकेत जबरी चोरी, 50 लाखांच्यावर मुद्देमाल केला लंपास

Latur Bank Robbery : ‘या’ जिल्ह्यातील ग्रामीण बँकेत जबरी चोरी, 50 लाखांच्यावर मुद्देमाल केला लंपास

महाराष्ट्रातील लातूर येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जबरी चोरीची घटना उघडकीस आली आहे. शिरूर अनंतपाल येथील पोलीस पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

  • -MIN READ Latur,Maharashtra
  • Last Updated :

लातूर, 06 सप्टेंबर : महाराष्ट्रातील लातूर येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जबरी चोरीची घटना उघडकीस आली आहे. शिरूर अनंतपाल येथील पोलीस पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. (Latur Bank Robbery) काल (दि.05) सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले. बँकेतून 27 लाख रुपये रोख आणि 22 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने पोलिसांना दिली. दरम्यान याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ भागात नगर पंचायत भवन येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. याच शाखेत चोरट्यांनी जबऱ्या चोरीचे धाडस केले आहे. या घटनेबाबत शाखा व्यवस्थापक सौरभ खैरे म्हणाले कि, सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास बँक सुरू होणार असताना हा प्रकार उघडकीस आला. बँकेच्या मुख्य गेटची कडी तुटल्याचे तेथे उपस्थित लोकांनी पाहिले. त्यानंतर आत तपास केला असता मुख्य लॉकरही तुटलेले आढळून आले.  

हे ही वाचा :  रिक्षाचालक बनला चोर! 5000 कारची चोरी, हत्या, 3 बायका अन्.., 27 वर्षांची क्राईम फाईल वाचून व्हाल शॉक

यामुळे आम्ही सगळेच गोंधळात पडलो. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. ते म्हणाले की, जवळपास 14 गावांतील लोकांनी या शाखेत आपली खाती उघडली आहेत. प्राथमिक गणनेनुसार एकूण 27 लाख रुपये रोख आणि 22 लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. जवळपास तब्बल 49 लाख रुपयांचे ऐवज चोरीला गेल्याची माहितीसमोर आली आहे.

जाहिरात

दरम्यान शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिरूर अनंतपाळचे निरीक्षक रामेश्वर टाट यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्या बँकेत चोरीचे मुल्यांकन सुरू आहे. हा आकडा 57 लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो.

हे ही वाचा :  ATM मध्ये पैसे भरण्यासाठी आलेली गाडी; कर्मचारी उतरताच कॅश व्हॅन घेऊन चालक फरार, मुंबईतील घटना

बँकेच्या मुख्य लॉकरमध्ये पाच प्रकारचे कुलूप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लॉकर ज्या पद्धतीने फोडण्यात आले त्यावरून चोरट्यांची अत्यंत चतुराई दिसून येते. दरम्यान या घटनेचा तपास सुरू आहे. चोरट्यांना आम्ही लवकरात लवकर पकडू असेही ते म्हणाले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात