मुंबई, 19 जून: आजही महाराष्ट्र्रात (Maharashtra Rain Updates) काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरूच आहे. रडारच्या नव्या सॅटेलाईट इमेजनुसार रोहा, रायगड, श्रीवर्धन, हर्णे, दापोली, ठाणे या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. जाणून घ्या कशी राज्यातल्या पावसाची परिस्थिती. (Latest Updates Rain) मुंबईत (Mumbai Rain) काही ठिकाणी जोरदार (Heavy rainfall) तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. तर दक्षिण (South Mumbai)मुंबईत पावसाने विश्रांती घेतलीय.
Latest Radar img 1am,19 Jun:Khandala, Mahabaleshwar Pune Satara entire ghat area still covered by dense clouds.Roha RaIgad Shrvardhan Harnai Dapoli Thane too dense clouds.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 18, 2021
Possibility of mod to intense showers this areas nxt 3,4hrs
Mumbai clouds vry close frm E Suburb. Still in Q pic.twitter.com/yEHVof36l7
रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड - दापोली - मंडणगड मार्गावर खेडमधील एकविरा नगर येथे पुराचे पाणी साठल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पहाटे 2 ते 3 तास हा मार्ग ठप्प होता तर आताही केवळ मोठी वाहने या मार्गावरून धोका पत्करून जाताना दिसत आहेत. जगबुडी नदीच्या पुराचे पाणी खेड शहरात शिरायला सुरवात झाली आहे. खेड शहरातील नदीकाठी असणाऱ्या मच्छी मार्केटचा संपर्क तुटला. रायगड रायगड जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील तिन्ही नद्या तुडुंब भरून वाहतायत. आंबा ,कुंडलिका,सावित्री या धोक्याच्या पातळीच्या खाली आहे. दिवसभर असाच पाऊस पडला तर धोक्याच्या पातळीच्या वरती जाऊ शकतो. रायगड जिल्ह्यात सगळ्या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट 7 इंच राधानगरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळी वाढली. कोल्हापूर जिल्ह्यातील 54 बंधारे अद्याप पाण्याखाली गेलेत. कोल्हापूर शहर परिसरात पावसाची उघडीप सुरुच आहे. जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात मात्र रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. पुणे पुण्यात काल दिवसभर जोरदार सरी कोसळल्या. रात्रीही पावसाची रिपरिप सुरू होती. आता सकाळी मात्र पावसाने उघडीप दिलीय. शहरात ऊन पडलं आहे. मात्र काल दिवसभरात 29.2 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणार मिळून 7 टीएमसी इतका पाणी साठा झाला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा सव्वा टीएमसी जास्त आहे. नागपूर या वर्षी विदर्भात एक आठवड्याआधी मान्सून दाखल झाला आणि बऱ्यापैकी पाऊस झाल्यानं विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात 60 टक्क्यांच्या पेरणी झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयात झालेल्या कमीदाबाच्या पट्ट्या मुळे पूर्व विदर्भात रोज रिमझिम पावसाची हजेरी असते. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे. सातारा साताऱ्यात मान्सूनचे आगमन झाले असून गेल्या पाच दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. जोरदार पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओढे नाले, धबधबे ओसंडून वाहू लागल्याने धरण क्षेत्रातही पाण्याची चांगलीच आवक वाढली आहे. कोयना आणि उरमोडी धरणातून पाणी सोडण्यात आले असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.