जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पावसाचा जोर, कोयना धरणाचे सहा दरवाजे खुले होणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पावसाचा जोर, कोयना धरणाचे सहा दरवाजे खुले होणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पावसाचा जोर, कोयना धरणाचे सहा दरवाजे खुले होणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाच्या (koyna dam water) पाणलोट क्षेत्रातही पावसाचं प्रमाण वाढलं आहे. धरणातील पाणीसाठा 100 टीएमसीपर्यंत गेला आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

  • -MIN READ
  • Last Updated :

सातारा, 12 सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झालं आहे. त्यामुळं मुंबईसह राज्यात पावसाचा (Rain) जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असताना कोयना धरणाच्या (koyna dam water) पाणलोट क्षेत्रातही पावसाचं प्रमाण वाढलं आहे. धरणातील पाणीसाठा 100 टीएमसीपर्यंत गेला आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आज दुपारी 2 वाजता कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10000 क्युसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोयना धरणातील पाणीसाठा सध्या 103.19 टीएमसी झालाय. पावसाचं प्रमाण असंच वाढत राहिल्यास विसर्गामध्ये वाढ होणार असल्यानं कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वाचा -  पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर गुन्हा दाखल, अडीच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप कोयना धरण पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून 1050 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. हे वाचा -  बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र; मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार कोयना धरणातून दुपारी 2 वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यानं नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर कोयना नदीकाठच्या गावांसह कराड आणि सांगलीत देखील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुशं तेथील नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: koyana , rain
  • First Published :
जाहिरात
जाहिरात