कोपर्डी प्रकरणी उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला, 29 नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा

कोपर्डी प्रकरणी उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला, 29 नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टासमोर आपली बाजू माडंतील. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आणि आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमे या दोघांच्या वकिलांनी काल शिक्षेवर युक्तिवाद केला

  • Share this:

 अहमदनगर,22 नोव्हेंबर : कोपर्डी खून आणि बलात्कार खटल्यामध्ये उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला. आपल्या युक्तिवादात निकम म्हणाले, 'हा दुर्मिळ खटला आहे. शांत डोक्याने  नियोजित खून केलेला आहे.'  त्यांनी खुनासंदर्भातील 13 मुद्दे सांगत सर्व घटनेचा क्रम सांगितला. आणि तिघांनाही मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केलीय.

काल संतोष भवाळचे वकील गैरहजर होते. त्यांचा युक्तिवाद झाल्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टासमोर आपली बाजू मांडली. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आणि आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमे या दोघांच्या वकिलांनी काल शिक्षेवर युक्तिवाद केला. या प्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींना शनिवारी दोषी करार दिलाय. 13 जुलै रोजी नगर जिल्ह्यात कोपर्डीत एका अल्पवयीम मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणी नगर सत्र न्यायालय काय निकाल देत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोपर्डी प्रकरण: आतापर्यंतचा  युक्तिवाद

- दोषी नंबर एक - जितेंद्र शिंदे

- जितेंद्र शिंदेच्या वकिलांचाही युक्तिवाद पूर्ण

- मी तिला मारलं नाही, शिंदेचा कोर्टात दावा

- फाशीऐवजी जन्मठेप किंवा त्याहून कमी शिक्षेचा विचार करा - शिंदे

- दोषी नंबर तीन - नितीन भैलुमे

- दोषी नितीन भैलुमेच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण

- मी निर्दोष आहे - नितीन भैलुमे

- दोषीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही

- तो 26 वर्षांचा विद्यार्थी असून त्याचं कुटुंब सर्वसामान्य

- त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून

- त्याला गुन्ह्यात अडकवलंय, तो बलात्कार, हत्या प्रकरणात नव्हता

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 08:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading