जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / gram panchayat election result : कोल्हापूरच्या कागलमध्ये राष्ट्रवादी-भाजपमध्ये कांटे की टक्कर, आतापर्यंतचा निकाल

gram panchayat election result : कोल्हापूरच्या कागलमध्ये राष्ट्रवादी-भाजपमध्ये कांटे की टक्कर, आतापर्यंतचा निकाल

ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022

ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022

कोल्हापुरात ठाकरे गटाने खाते उघडले आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 20 डिसेंबर : राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. 34 जिल्ह्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. आज या निवडणुकीचा निकाल आता समोर येत आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाने खाते उघडले आहे. व्हनाळी येथे माजी संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंचपदी विजयी झाले आहेत. तर वडणगे येथे ठाकरे गटाच्या संगीता शहाजी पाटील 4679 मतांनी सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. दरम्यान, शिंदे गटाला शिरोळ तालुक्यात मोठे यश मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. अकिवाटमधून सरपंच पदाचे वंदना सुहास पाटील उमेदवार विजयी झाले आहेत. खिद्रापूर मधून सरपंचपदाच्या उमेदवार सारिका कुलदीप कदम विजयी झाल्या आहेत. टाकवडेमधून सरपंच पदाचे उमेदवार सविता मनोज चौगुले विजयी झाले आहेत. कागल तालुका -  कागल तालुक्यातील 26 पैकी 12 सरपंच पदाचे निकाल झाले आहेत. निकाल पुढीलप्रमाणे - राष्ट्रवादी 04, भाजप 04 , शिंदे गट 02, ठाकरे गट 02 दरम्यान, या निवडणुकीदरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे. गोकुळ दूध संचालक प्रकाश पाटील यांच्या गटाचा पराभव झाला आहे. नेर्ली ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीत अंकुश पुजारी धनगर विजयी झाले असून गोकुळ संचालक प्रकाश पाटील यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. प्रकाश पाटील हे आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे संचालक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात