मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ऊस टोळ्यांचा कोल्हापुरात हैदोस, शेतकऱ्यांना 30 कोटींना लुबाडलं, 48 तासांमध्येच...

ऊस टोळ्यांचा कोल्हापुरात हैदोस, शेतकऱ्यांना 30 कोटींना लुबाडलं, 48 तासांमध्येच...

ऊस टोळ्यांचा कोल्हापुरात हैदोस

ऊस टोळ्यांचा कोल्हापुरात हैदोस

ऊस तोडण्यासाठी येणाऱ्या टोळ्यांची कोल्हापूरकरांची तब्बल 30 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी 300 गुन्हे दाखल झाले आहेत.

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी

कोल्हापूर, 22 मे : ऊस तोडण्यासाठी टोळ्यांना आगाऊ पैसे देत असाल तर सावधान. कोल्हापूरकरांची ऊस टोळ्या मुकादमानी तब्बल 30 कोटींची फसवणूक केली असून दोन दिवसात 300 गुन्हे दाखल झालेत. पोलिसांनीही शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेत विशेष कॅम्प आयोजित केले आहेत. त्यातून हे गुन्हे दाखल होत असून याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पट्ट्यात शेतकऱ्यांना वेगळ्याच त्रासाला समोर जावे लागत आहे. वर्षानुवर्षे केवळ शब्दावर येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या आता पैसे घेऊनही येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काहींनी या टोळ्यांना आगाऊ म्हणून लाखोंची रक्कम दिली आहे. मात्र, मुकादमांनी या हंगामात ऊस तोड मजूरच पाठवले नसल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. गावातील शेतकऱ्यांचे पैसे एकत्र गोळा करून आणि घरावर कर्ज काढून काहींनी या मुकादमांना पैसे दिले होते. मात्र, टोळ्या न आल्याने त्यांची फसवणूक झाली. या मुकादमानी ऍडव्हान्स घेऊन केलेले करारपत्र सुद्धा या शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, हे पैसे परत मागितल्यास धमक्या देत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे पदरमोड करून घातलेले पैसे अंगलट आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

वाचा - खळबळजनक! मेकअपसाठी गेली होती नवरी; पोलिसाने ब्यूटी पार्लरमध्ये घुसून झाडली गोळी

पोलीस ठाण्यातही खेटे घालून हाती काहीच न मिळाल्याने आत्महत्या सारख्या टोकाचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आता काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण कोल्हापूरचे एसपी शैलेश बलकवडे यांनी यासाठी विशेष मोहीम आखली असून त्यामुळे जिल्हयातील सगळ्याच पोलीस ठाण्यात आता गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. ऊस पट्यात मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता भासते त्यातून हे व्यवहार होत असतात. पूर्वी हे व्यवहार शब्दावर व्हायचे आणि ते पाळलेही जायचे. आता मात्र काही ठराविक लोकांमुळे फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता कोल्हापूर पोलीस दल पुढे सरसावले आहे.

खरंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीला या फसवणुकीचे लागलेले ग्रहण चिंतेचा विषय बनला आहे. कोल्हापूर पोलिसांनी कडक भूमिका घेत त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. आता इतरही जिल्ह्यातल्या पोलिसांनी अशी भूमिका घेण्याची गरज आहे. जेणेकरून येत्या हंगामात शेतकऱ्यांना फसवण्याचे धाडस अशा मुकादमांना होणार नाही.

First published:
top videos