कोल्हापूर, 08 सप्टेंबर : मागच्या दोन दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव मोदी शाह यांच्यावर टीका केल्याने झाल्याचे म्हणाले. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले कि, तुम्हाला जिल्हातून पळ काढाला सोबत कोल्हापूरच्या जनतेने भाजपमुक्त कोल्हापूर केल्याचे विसरून नये असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि, राजू शेट्टी यांच्या लोकसभेच्या निवडणुकीतील शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागलेल्या पराभवाचा आसुरी श्रेय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी हे ही विसरू नये कि त्यांना तर जिल्ह्यातून पळ काढावा लागला आहे. पण कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी भाजपमुक्त कोल्हापूर केलं असल्याची टीका स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी केले.
हे ही वाचा : नाशिक बस अपघात हे शिंदे सरकारचे पाप, नाना पटोलेंचं टीकास्त्र
मंत्री चंद्रकांत दादा पाटील पुणे येथील कार्यक्रमात मोदी व शहा यांच्या कौतुकाचे गोडवे गात असताना 2019 मध्ये मोदी व शाह यांच्या विरोधात बोलल्यानंतर राजू शेट्टी यांना पराभवास सामोरे जावे लागल्याचे वक्तव्य केले. तसेच हा पराभव चंद्रकांत दादा यांनी केला असल्याचे एका केंद्रीय मंत्र्याने देखील सांगितले. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की मोदींच्या धोरणामुळे देशातील शेतकऱ्यांचे वाटोळे लागले या धोरणांना राजू शेट्टी यांनी विरोध केला.
या सुडाने आंधळे होवून त्यांचा पराभव करण्यात आला. राजू शेट्टी यांनी अनेक वेळा बोलले आहेत की मोदींच्या चुकीच्या शेतकरी विरोधी धोरणाला विरोध केल्यानेच माझा पराभव झाला आहे. माझा त्यामुळे पराभव झाला असला तरी मला त्याचा अजिबात पश्चाताप होत नाही. असे वैभव कांबळे म्हणाले. उलट चंद्रकांत पाटील यांचं दिवसेंदिवस होत असलेल्या अधपतनामुळे विमनस्क होवून वाटेल तसे ते गरळ ओकू लागले आहेत. अशा वक्तव्यातून चंद्रकांत पाटील पुन्हा मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सिध्द करीत आहेत.
हे ही वाचा : ‘अयोध्येत सुसाईड बॉम्बर’ PFI ची उघड धमकी; मोदी, शहा, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे सुद्धा टार्गेटवर!
दादा तुम्ही राज्यातील दोन नंबरचे मंत्री होता आपणांस आजही आव्हान आहे कि तुमच्यात हिम्मत असेलच तर पहिल्यांदा स्वत:च्या 9 सदस्य असलेल्या खानापूर गावची ग्रामपंचायत ताब्यात घेवून दाखवावी. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून येवून दाखवावे. पुण्यासारख्या ठिकाणी जावून चार वर्षांपूर्वीचा राजू शेट्टी यांचा झालेला पराभवाची आपल्याला वल्गना करावी लागते यातच राजू शेट्टींचा नैतिक विजय असल्याचे कांबळे म्हणाले.