जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गणपती विसर्जन पंचगंगेतच! आमदार प्रकाश आवाडे आक्रमक, सनातनचा पाठिंबा, कोल्हापुरात नवा वाद पेटणार?

गणपती विसर्जन पंचगंगेतच! आमदार प्रकाश आवाडे आक्रमक, सनातनचा पाठिंबा, कोल्हापुरात नवा वाद पेटणार?

गणपती विसर्जन पंचगंगेतच! आमदार प्रकाश आवाडे आक्रमक, सनातनचा पाठिंबा, कोल्हापुरात नवा वाद पेटणार?

गणेश मूर्ती विसर्जित करण्यापेक्षा (Ganeshotsav Kolhapur) दान करण्याची पर्यावरण पूरक मूर्तीदान चळवळ कोल्हापुरात चांगलीच रुजलीय मात्र आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी यावर्षी पंचगंगा नदीतच मूर्ती विसर्जनाचा हट्ट धरत या चळवळीलाच खो घालण्याचा प्रयत्न केलाय.

  • -MIN READ
  • Last Updated :

ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर, 16 ऑगस्ट : गणेश मूर्ती विसर्जित करण्यापेक्षा (Ganeshotsav Kolhapur) दान करण्याची पर्यावरण पूरक मूर्तीदान चळवळ कोल्हापुरात चांगलीच रुजलीय मात्र आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी यावर्षी पंचगंगा नदीतच मूर्ती विसर्जनाचा हट्ट धरत या चळवळीलाच खो घालण्याचा प्रयत्न केलाय. तर सनातन संस्थेनेही हीच मागणी लावून धरली आहे, त्यामुळे धार्मिकतेच्या नावाखाली ही चळवळ मोडीत काढण्याच्या प्रयत्नाला कोल्हापूरकर प्रतिसाद देतात का? हे पाहावे लागेल. गणपती यायला अजून पंधरा दिवस बाकी आहेत, मात्र तोपर्यंतच गणेश विसर्जनाचा मुद्दा कोल्हापुरात गाजू लागला आहे. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनाला परवानगी दिल्याचं म्हणत यावर्षी मूर्ती नदीतच विसर्जन करू, असे स्पष्ट केले आहे. इतर घटकांमुळे नदीचे होणारे प्रदूषण दिसत नाही का? असे म्हणत त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे मूर्तीदान चळवळ राबवणाऱ्या कोल्हापुरात एका आमदारामुळे या चळवळीला खो बसण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूरकरांनी मूर्तीदानाची चळवळ हाती घेतली. 1992 मध्ये अंनिसने सुरवातीला निर्माल्य दान चळवळ राज्यात आणली. 1998 मध्ये कोल्हापुरात मूर्तीदान ही चळवळ सुरू झाली. 2015 पासून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 16 लाख 41 हजार मूर्तीदान करत ही चळवळ लोकचळवळ झाली आहे. विज्ञानवादी लोक, डाव्या संघटना, रंकाळा बचाव समिती आणि जिल्हा, पालिका प्रशासन यांनी सातत्याने प्रबोधन केले त्याचे हे यश आहे. एका बाजूला या चळवळीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना दुसऱ्या बाजूला पंचगंगा नदीतच विसर्जनाचा आग्रह होऊ लागला आहे. सनातन संस्थेने सुद्धा धार्मिक दृष्टया वाहत्या पाण्यातच विसर्जन योग्य असल्याचे म्हणत आवडेंचा भूमिकेला पाठबळ दिले आहे. खरंतर मूर्ती दान हा भावनेशी जोडलेला विषय आहे. मात्र पर्यावरणप्रेमी कोल्हापूरकरांनी वाढतं नदी प्रदूषण पाहता त्या काहिलीत विसर्जनावर भर दिला आणि जीवनदायिनी पंचगंगा वाचवायला सुरवात केली, त्यामुळे यावर्षीही हाच कित्ता कोल्हापूरकर गिरवतील आणि ही चळवळ पुढे घेऊन जातील, असा विश्वास पंचगंगा बचावासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी व्यक्त केलाय. पंचगंगा नदीमुळे कोल्हापूर सुजलाम सुफलाम झाले आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून तिची गटारगंगा झाली आहे. याच अवस्थेमुळे आवाडे यांच्या इचलकरंजीमध्येच कावीळची साथ येऊन तब्बल 40 जणांचे जीव गेले होते. याची जरा तरी जाणीव आवाडे यांना हवी होती. उत्सव एक दिवसाचा होईल मात्र त्यानंतरचे दुखणे कायमचे असणार असून केवळ मतांवर डोळा ठेऊन वक्तव्य करणाऱ्या आवडेंनी या 40 जणांच्या मृत्यूला कारणीभूत हेच प्रदूषण होते, याची जरा डोळे बंद करून आठवण करावी आणि याची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी हीच अपेक्षा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात