कोल्हापुरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बायको, मुलासह 30 पेक्षा अधिक जणांच्या संपर्कात

कोल्हापुरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बायको, मुलासह 30 पेक्षा अधिक जणांच्या संपर्कात

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणीसाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

  • Share this:

कोल्हापूर, 27 मार्च : कोल्हापूर शहरात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात तब्बल 30 पेक्षा जास्त जण आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणीसाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने आज तपासणीसाठी पुण्याच्या लॅबला पाठवण्यात येणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातही आता कोरोनाची एण्ट्री झाली आहे. कोल्हापूर शहरात ज्या भागांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्या भागात जिल्हा प्रशासनाच्या वतीने औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. कारण हा कोरोनाबाधित रुग्ण बायको आणि मुलासही कॉलनीतील अनेकांच्या संपर्कात आला होता.

या भागातील सगळे रस्ते बंद करण्यात आले असून जिल्ह्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी एक महिला आणि एक पुरुष आहे. पुरुष रुग्ण हा पुण्याहून चार दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये आला होता. तर महिला रुग्ण ही इस्लामपूर मधल्या कोरोना रुग्णांची नातेवाईक आहे. तिचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता आणखी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.

विदर्भातही पसरला कोरोना

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे देशाची उपराजधानी नागपूरमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागपूरमध्ये आज आणखी 5 नवे रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 9 वर पोहोचली आहे.

नागपुरात आज आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. 4 रूग्ण हे नागपूरमध्ये तर 1 रुग्ण गोंदियामध्ये आढळला आहे. दिल्लीतून नागपुरात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

First published: March 27, 2020, 12:26 PM IST

ताज्या बातम्या