दापोली, 26 मार्च : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट (Anil Parab resort) संदर्भात किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी थेट हे रिसॉर्ट पाडण्याबाबत 19 मार्च रोजी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लिहिलं होतं, “26 मार्च - चला दापोली…. अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया”. त्यानंतर आज सकाळीच किरीट सोमय्या हे दापोली दौऱ्यावर निघाले. किरीट सोमय्या हे प्रतिकात्मक हातोडा घेऊन निघाले असून त्यांच्यासोबत शेकडो भाजपचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत. किरीट सोमय्यांच्या या दौऱ्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध करण्यात येणार आहे. किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दापोलीत पोलीस प्रशासन अलर्टवर आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खरबरदारी घेत पोलीस प्रशासनाने दापोलीत जमावबंदी लागू करत शहरातील नाक्या नाक्यात बॅरिकेट लावून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. वाचा : “चला दापोली… अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया” किरीट सोमय्यांच्या ट्विटने खळबळ याच दरम्यान दापोलीकडे निघालेल्या किरीट सोमय्या यांना कशेडी घाटात पोलिसांकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी यावेळी 149 ची नोटीस देण्याचा प्रयत्न केला मात्र, ही नोटीस स्वीकारण्यास किरीट सोमय्या यांनी नकार दिला आहे. किरीट सोमय्या यांना पोलिसांनी नोटीस देताच सोमय्यांनी ती स्वीकरण्यास नकार दिला. यावेळी किरीट सोमय्या यांच्यासोबत असलेल्या शेकडो भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. कोणत्या कायद्या अंतर्गत नोटीस देत आहात? असा सवाल किरीट सोमय्यांनी यावेळी पोलिसांना विचारला. काय आहे ही नोटीस?
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भाजप नेत्यांकडून आरोप करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप सोडत नाहीये. त्यातच आता किरीट सोमय्या हे थेट अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्याचं म्हणत दापोलीला निघाले आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा एकदा होताना दिसत आहे. जशास तसे उत्तर देणार - निलेश राणे किरीट सोमय्या यांना दापोलीत रोखण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आव्हान दिले होते. त्यावर निलेश राणे यांनी म्हटलं, हिंमत असेल तर रोखून दाखवा. आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवायला नाही तर बेकायदेशीर रिसॉर्ट तोडण्याच्या मागणीसाठी दापोलीत जातोय. कोणी मस्ती केली तर जशास तसे उत्तर देणार असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. दापोली येथील वादग्रस्त साई रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी येणाऱ्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी आव्हान दिलं आहे की त्यांना दापोलीत रोखलं जाईल. मात्र भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. निलेश राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून देखील बजावण्यात आलेली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांकडून ठिकाणी चोख बंदोबस्त देखील ठेवलेला आहे. खेडमध्ये मात्र तणावपूर्ण वातावरण आहे. निलेश राणे आणि त्यांचे शेकडो समर्थक मुंबई-गोवा महामार्गावर ती किरण सोमय्या यांच्या यांना दापोली घेऊन जाण्यासाठी उपस्थित आहेत.