Home /News /maharashtra /

VIDEO : महिलेसबोत अरेरावी आणि राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख, मनसैनिकांनी कर्मचाऱ्याला केली मारहाण

VIDEO : महिलेसबोत अरेरावी आणि राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख, मनसैनिकांनी कर्मचाऱ्याला केली मारहाण

मनसे कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करुन त्याला माफी मागण्यास भाग पाडलं आहे.

कल्याण, 25 फेब्रुवारी : एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने महिलेसोबत उद्धट भाषेत अरेरावी केली. इतकंच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, असा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करुन त्याला माफी मागण्यास भाग पाडलं आहे. कल्याण पूर्व भागातील काटेमानीवली परिसरात आर. एल. बी. या फायनान्स कंपनीची शाखा आहे. या शाखेतून एका महिलेने लोन घेतले होते. वारंवार या महिलेला इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी फोन केला जात होता. महिला आपली व्यथा मांडण्यासाठी फायनान्स कंपनीच्या शाखेत पोहचली. याठिकाणी तिला कर्मचारी अनिल भोगे यांनी आरेरावी केली, असा आरोप करण्यात आला आहे. महिलेशी बोलत असताना य कर्मचाऱ्याने राज ठाकरे आले तरी काही फरक पडणार नाही, असं म्हटलं. महिलेने ही बाब मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितली. मनसेचे पदाधिकारी उदय वाघमारे, विद्यार्थी सेना, महिला सेना पदाधिकारी इतर कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी अनिल भोगेला या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्याला उठाबशा काढायला लावून माफी मागायला लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना 23 फेब्रुवारीला संध्याकाळी घडली होती. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'कोरोना काळात सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत. फायनान्स कंपन्यांकडून लोकांना त्रास दिला जात आहे. संबंधित महिलेने आम्हाला फोन करुन सर्व प्रकार सांगितला. राज ठाकरे यांचं नाव घेण्याचं काही कारणच नव्हतं. त्यामुळे आम्ही त्याला मनसे स्टाईल धडा शिकवला,' अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकारी उदय वाघमारे यांनी दिली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: MNS, Raj Thackeray (Politician)

पुढील बातम्या