जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kalyan-Dombivli Rain : पाऊस काही ऐकेना, ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी, मुंबईतही हायअलर्ट

Kalyan-Dombivli Rain : पाऊस काही ऐकेना, ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी, मुंबईतही हायअलर्ट

Rain update

Rain update

Kalyan-Dombivli Rain Updates : ठाणे आणि कल्याणमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारीही हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

    ठाणे, 27 जुलै : मुंबईसह ठाणे आणि कोकणात पावसांची संततधार सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये ठाणे आणि मुंबई पावसाने धुमशान घातले आहे. शुक्रवारी 28 जुलै रोजी मुंबईसह ठाणे आणि कोकणात पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ठाण्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहरासह उपनगराला पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबई शहरात बुधवारी रात्रीपासून सुरू अललेली पावसाची संततधार दिवसभर सुरूच होती. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर दिसून आला. मुंबईत गेल्या 24 तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 223 मिलीमीटर , तर सांताक्रूझ केंद्रात 145 मिली पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण मुंबईतही पावसाचं जोर दिसून आला. सरीवर सरी कोसळत असल्यामुळे मुंबईल्या कुर्ला,बोरीवली, दहीसरमधल्या अनेक सखल भागात पाणी साचल्याचं दिसून आलं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    तर ठाणे आणि कल्याणमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारीही हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून पुन्हा एकदा सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस झाला असला तरी रेल्वे वाहतूक सुरू होती. मध्य रेल्वेवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मात्र खड्ड्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. उद्याही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: thane
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात