विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 28 नोव्हेंबर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एका सिंहाचा मृत्यू झाला आहे. जेस्पा असे या सिंहाचे नाव आहेत. तो मागील 11 वर्षांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होता. आजारामुळे या जेस्पा नावाच्या सिंहाचा मृत्यू झाला आहे. शोभा आणि रवींद्र नावाच्या सिंहापासून या जेस्पा सिंहाचा जन्म झाला होता.
उपचाराला प्रतिसाद दिला नाही -
मुंबईच्या बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्राणी संग्रहालयातील 11 वर्षे वयाच्या जेस्पा नावाच्या सिंहाचा मृत्यू झाला आहे. काल रविवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याचा जन्म उद्यानातच 22 सप्टेबरला 2011मध्ये शोभा आणि रवींद्र नावाच्या सिंहापासून झाला होता.
जेस्पा हा गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे त्याला प्रदर्शनाकरिता सोडण्यात येत नव्हते. त्याच्यावर पशू वैद्यकांचे तांत्रिक समितीच्या मार्गदर्शनात उपचार सुरू होते. मात्र, त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. अखेर त्याचा काल रविवारी मृत्यू झाला.
हेही वाचा - लातूरच्या ॲडिशनल सीईओंच्या पत्नीची हॉटेलमध्ये आत्महत्या, मुलाच्या लग्नाआधीच भयानक पाऊल
यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबई पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ञ डॉ. गाढवे यांनी केले. प्राथमिक अहवालानुसार अंतर्गत अवयवांचे निकामी होणे आणि अशक्तपणायामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉ. गाढावे यांनी वर्तविली आहे. शवविच्छेदनानंतर त्याला श्रद्धांजली वाहून मृतदेहाचे दहन करण्यात आले.
लायन सफारी सुरू होणार -
गुजरातमधून मुंबईत दोन सिंह नर आणि मादी बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्राणी संग्रहालयात आणण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लायन सफारी सुरू होण्याची शक्यता आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Mumbai, National park