मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'जी हाँ हुजूर, मैं गीत बेचता हूँ..' नागराज मंजुळेनं सादर केली अफलातून कविता! पाहा Video

'जी हाँ हुजूर, मैं गीत बेचता हूँ..' नागराज मंजुळेनं सादर केली अफलातून कविता! पाहा Video

X
Jalna

Jalna News : चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यानं सादर केलेली भन्नाट कविता तुम्ही ऐकली आहे का?

Jalna News : चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यानं सादर केलेली भन्नाट कविता तुम्ही ऐकली आहे का?

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Jalna, India

  नारायण काळे, प्रतिनिधी

  जालना, 23 मार्च : स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल‎ ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान जालना‎ यांच्या वतीने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै.‎ राय हरिश्चंद्र साहनी यांच्या‎ स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 25 व्या‎ वर्षातील रौप्य महोत्सवी "दु: खी"‎ राज्य काव्य पुरस्कार नुकताच जे. ई.‎ एस. महाविद्यालयात देण्यात आला. कवितेचा पाडवा या कार्यक्रमात डॉ. ‎विजय चोरमारे यांना चित्रपट दिग्दर्शक‎ नागराज मंजुळे यांच्या हस्ते प्रदान‎ करण्यात आला.‎ यावेळी रंगलेल्या कवितेचा पाडवा कार्यक्रमातील कवितांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

  या कवितेला उत्स्फूर्त दाद

  यावेळी नागराज मंजुळे यांनी सादर केलेली जी हाँ हुज़ूर, मैं गीत बेचता हूँ या कवितेला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. तर डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी डॉ. विजय चोरमारे यांच्या राष्ट्रगीत या कवितेतील कडवे सादर केले. यांनतर पुरस्कार विजेते डॉ. विजय चोरमारे यांनी त्याची राष्ट्रगीत ही संपूर्ण कविता प्रेक्षकांपुढे ठेवली. या कवितेला देखील प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. नागराज मंजुळे यांनी प्रेमावर सादर केलेली कविता रसिकांना विशेष भावली.

  सर्व क्षेत्रात कवितेची सरमिसळ व्हावी

  महात्मा फुले यांच्यापासून ते सर्व कवींनी जगाचा विचार केला. सर्व प्रश्नांची उत्तरे कवितेत असली तरी उद्योग, व्यापार, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा क्षेत्रातील मंडळी त्यांच्या क्षेत्रातील व्यक्तींनाच भेटतात. या सीमारेषा भेदून सर्व क्षेत्रात कवितेची सरमिसळ व्हावी, अशी अपेक्षा यावेळी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली.

  Wardha News: पर्यावरणाचे धडे देणारी शाळा, हरितसेनेची राष्ट्रीय पातळीवर दखल, पाहा Video

  माणूस म्हणून नीट जगा

  माणसातला हिंस्र पशू जागृत होऊ देऊ नका, माणूस म्हणून नीट जगा ही कवीची प्रार्थना आणि भूमिका आहे, असं डॉ प्रल्हाद लुलेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला सिने कलावंत सयाजी शिंदे यांची सुद्धा उपस्थिती होती.

  First published:
  top videos

   Tags: Jalna, Local18, Nagraj manjule