जालना, 15 जुलै: आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक पालकाची धडपड सुरू असते. हल्ली तर हातावर काम करणाऱ्यांची मुले देखील खाजगी शाळेत शिक्षण घेत आहेत. इंग्रजी माध्यमात मुलांना शिकवायचं फॅड आलं आहे. त्यामुळे पोटाला चिमटा काढून अगदी शिक्षकही आपल्या मुलांना सरकारी शाळा सोडून नावाजलेल्या शाळांमध्ये घालण्याचा अट्टाहास करत असतात. मात्र जालन्याच्या सीईओ वर्षा मीना यांनी हा पायंडा मोडण्याचा निर्धार केला आहे. सीईओंचा मुलगा सरकारी अंगणवाडीत जालन्याच्या सीईओ वर्षा मीना यांनी पालकांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. सरकारी शाळा या इंग्रजी माध्यमातील शाळांपेक्षा कुठेच कमी नाहीत, हे फक्त सांगण्याऐवजी त्यांनी आपल्या स्वत:च्या मुलाला दरेगाव येथील अंगणवाडीत प्रवेश घेतला. सीईओंचा मुलगाच अंगणवाडीत येत असल्याने शाळेचं आणि गावाचं रुपडं पालटलं आहे. तसेच गावकऱ्यांची सरकारी शाळांबद्दल असणारी मानसिकताही बदलत आहे.
सरकारी अंगणवाडीत चांगलं शिक्षण सरकारी अंगणवाडीत बालकांना चांगलं शिक्षण मिळत आहे. अनेक अंगणवाड्या अद्ययावत झाल्या आहेत. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. अंगणवाडी कर्मचारीही बालकांची योग्य काळजी घेत आहेत. पालकांचा सरकारी अंगणवाडी आणि शाळांबद्दलचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही मुलगा अथर्वला सरकारी अंगणवाडीत घालण्याचा निर्णय घेतला, असे सीईओ मीना यांनी सांगितले. 6 वर्षांचा राजवीर कोणतीही तारीख अन् वार अचूकरित्या सांगतो पटापट, Video सरकारी शाळांबाबत हवा सकारात्मक दृष्टिकोन सध्याच्या काळात प्रत्येक पालकाचा आपल्या मुलांसाठी इंगिलश स्कूलचा हट्ट असतो. मात्र, सरकारी शाळा आणि अंगणवाडीतही उच्च दर्जाचं शिक्षण उपलब्ध होत आहे. त्यामुळे पालकांनी सराकारी शाळांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. याचा आदर्शच जालन्यातील सीईओ वर्षा मीना यांनी घालून दिला आहे.