जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सावरकर भवनासाठी कोट्यवधींचं घर दान, निवृत्त इंजिनिअरचा मोठा निर्णय

सावरकर भवनासाठी कोट्यवधींचं घर दान, निवृत्त इंजिनिअरचा मोठा निर्णय

सावरकर भवनासाठी कोट्यवधींचं घर दान, निवृत्त इंजिनिअरचा मोठा निर्णय

जालना शहरातल्या एका निवृत्त इंजिनिअरनं आपलं घर सावरकर भवनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

जालना, 27 जुलै : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वोच्च योगदान देणाऱ्या क्रांतीकारांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव आघाडीवर आहे. सावरकरांच्या नावावर देशात बरंच राजकारण होतं. पण, त्यांचं कार्य आजही अनेकांना प्रेरणा देणारं आहे. जालना शहरातल्या एका निवृत्त इंजिनिअरनं आपलं 1 कोटींचं घर सावरकर भवनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. का घेतला निर्णय? श्रीकृष्ण नारायण कुलकर्णी असं या सावरकर भक्ताचं नाव आहे. जालनामधल्या भाग्यनगर या उच्चभ्रू वस्तीत 2800 चौरस फूट जागेवर असलेल्या घराच्या जागेवर सावरकर भवन उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.

News18लोकमत
News18लोकमत

सध्या 81 वर्षाचे असलेले कुलकर्णी त्यांच्या पत्नीसह या घरात राहतात. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. माझ्या संपत्तीचा समाजकार्यासाठी वापर व्हावा अशी माझी इच्छा होती. मी माझ्या घरासोबतच एका गरिबाला घर बांधून दिलं होतं. त्यानंतरच स्वत: गृहप्रवेश केला होता. मी अंदमानमधील 303 क्रमांकाच्या खोलीत जाऊन सावरकरांचं गायले आहे. सावरकरांचे बरेच खंड वाचले असून त्यांचं आयुष्य सर्वांसमोर यावं असा माझा प्रयत्न आहे. या उद्देशानं मी हे घर सावरकर भवनासाठी देण्याचा निर्णय घेतलाय, असं कुलकर्णी यांनी सांगितलं. एका तिकीटासाठी रात्रभर होते उभे, मनाशी ठरवलं अन् 85 वर्षांचे भाऊ करताय लालपरीची सेवा मुलींसाठी काढणार हॉस्टेल मुलींच्या अभ्यासासाठी सोय व्हावी म्हणून वसतिगृह तसेच अभ्यासिका बांधण्याचीही कुलकर्णी यांची योजना आहे.  सावरकर भवनाच्या पार्किंगमध्ये तीन खोल्या काढून त्यामध्ये ते राहणार आहेत. मी नसेन तेव्हा त्या खोल्या ट्रस्टकडे जमा होतील, अशी दानपत्रात नोंद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जालन्यातच स्वतंत्र ट्रस्ट अन् सव्वा कोटीचे भवन सावरकर भवनसाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. सावरकरप्रेमी स्वतंत्र ट्रस्ट निर्माण करणार असून त्यामध्ये 15 सावरकरप्रेमी दात्यांची निवड केली जाणार आहे. निधी उभा करण्याची कामगिरी ते पार पाडतील असं कुलकर्णी यांनी सांगितले. कधी पूर्ण होणार सावरकर भवन? कुलकर्णी यांनी  सावरकर भवनाचा आराखडा तयार केला आहे. डिसेंबर 2023 पर्यंत दान करण्यासंदर्भातल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता होईल. मिरज येथील आर्किटेक्टकडून भवनाचे संकल्पचित्र करणार आहोत. त्यानंतर डिसेंबर 2024 पर्यंत सावरकर भवन तयार होईल, असे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalna , Local18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात