जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Gay App वरून मैत्री झाली अन् बायकोशीही ठेवलं संबंध, नंतर जे घडलं ते भयानक

Gay App वरून मैत्री झाली अन् बायकोशीही ठेवलं संबंध, नंतर जे घडलं ते भयानक

Gay App वरून मैत्री झाली अन् बायकोशीही ठेवलं संबंध, नंतर जे घडलं ते भयानक

जालन्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी बँक कर्मचाऱ्याचा खून झाल्याची घटना समोर आली होती.

  • -MIN READ Local18 Jalna,Jalna,Maharashtra
  • Last Updated :

जालना, 21 एप्रिल : जालन्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी बँक कर्मचाऱ्याचा खून झाल्याची घटना समोर आली होती. हा खून जालना जिल्ह्यातील मंठा शहरात झाला होता. 7 एप्रिल 2023 रोजी संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हेगाराला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातल्या मंठा शहरात 7 एप्रिल रोजी एका बँकेची वसुली करणाऱ्या  कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या नेतृत्वात एक तपास पथक यावर काम करत होतं. पोलिसांनी या प्रकरणात 8 एप्रिल रोजी संशयित आरोपी सोपान सदाशिव बोराडे याला अटक केली.

जन्मदात्या बापालाच काढलं घराबाहेर? राष्ट्रवादीच्या आमदारावर आरोप, धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल

बोराडे यास न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मयत तरुण आणि आरोपीमध्ये बोल्ट गे app वरून मैत्री झाल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. त्या दोघांमध्ये दोन वर्षांपासून समलिंगी संबंध होते. त्यातच मयत तरुणाचे आरोपीच्या पत्नीशीही अनैतिक संबंध होते.

जाहिरात

त्यामुळे सोपान बोराडेसह त्याच्या काही नातेवाईकांनी 7 एप्रिल रोजी प्रदीप भाऊराव कायंदे यास लाकडी दांड्याने मारहाण करून त्याची हत्या केली. आणि मृतदेह जुने जगदंबा मिल परिसरात फेकून दिला.

नवऱ्यावर हत्येसह 15 गुन्हे, कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीची भाजपमध्ये एंट्री, बावनकुळेंनी केलं मात्र समर्थन

या प्रकरणात पोलिसांनी दुसरा संशयित आरोपी प्रकाश सदाशिवराव बोराडे याला देखील बेड्या ठोकल्या असून सध्या ही दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalna , Local18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात