जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जालन्यातील शेतकऱ्यानं घेतलं मोसंबी शेतीमधून तब्बल 14 लाखांचे उत्पन्न, पाहा कसं केलं नियोजन Video

जालन्यातील शेतकऱ्यानं घेतलं मोसंबी शेतीमधून तब्बल 14 लाखांचे उत्पन्न, पाहा कसं केलं नियोजन Video

जालन्यातील शेतकऱ्यानं घेतलं मोसंबी शेतीमधून तब्बल 14 लाखांचे उत्पन्न, पाहा कसं केलं नियोजन Video

जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मोसंबी शेतीमधून तब्बल 14 लाखांचे उत्पन्न मिळवलं आहे. कसे केले मोसंबी पिकाचे नियोजन पाहा.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

जालना, 22 जुलै : मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी सध्या फळबागाची शेती करत आहेत.  जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मोसंबी शेतीमधून तब्बल 14 लाखांचे उत्पन्न मिळवलं आहे. घनसावंगी तालुक्यातील पणेवडीच्या मनोज चव्हाण यांनी ही कामगिरी केलीय. सध्या त्यांच्या झाडावर 70 ते 80 टन माल असून यंदा यापासून 17 ते 18 लाख उत्पन्न होईल अशी अपेक्षा त्यांना आहे. कसे केले मनोज चव्हाण यांनी मोसंबी पिकाचे नियोजन पाहुयात. कसं केलं नियोजन? जालना जिल्ह्यातील पानेवाडीचे मनोज चव्हाण आणि त्याचे बंधू उद्धव चव्हाण हे वडिलोपार्जित 30 एकर शेती करतात. यापैकी सात एकर क्षेत्रावर त्यांनी मोसंबी बागेची लागवड केली आहे. 2014 मध्ये 600 तर 2016 मध्ये 600 अशी एकूण 1200 मोसंबी वृक्ष त्यांच्या शेतात आहेत. या झाडांची लागवड त्यांनी 14 बाय 18 फुटांवर केलीय.

News18लोकमत
News18लोकमत

लागवड केल्यानंतर या झांडांना योग्य खत मात्रा देऊन त्यांचा सांभाळ केला. चार वर्षानंतर त्यांना यापासून मोसंबीचे उत्पन्न सुरू झाले. मागील वर्षी त्यांनी आंबिया बहरची 55 टन मोसंबी 25 हजार रुपये प्रति टन या दराने विकली यातून त्यांना 14 लाख रुपयांचे उत्पन्न झाले. तर सध्या त्यांच्या मोसंबी बागेत 70 ते 80 टन मोसंबी असून यातून त्यांना 17 ते 18 लाख रुपये उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे मोसंबी बागा आहेत. मात्र योग्य नियोजन नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. चव्हाण यांनी आपल्या बागेच चांगले नियोजन केले आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मोसंबी तोड झाल्यानंतर ते वाळलेल्या फांद्यांची छाटणी करतात. त्यानंतर डीएपी आणि सुक्ष अन्नद्रव्ये असणाऱ्या खतांचा बेसल डोस झाडाला प्रति झाड सव्वा ते दीड किलो दिला जातो. पिकावर असलेल्या कीटक नुसार दोन ते तीन फवारण्या ते घेतात. तसेच उन्हाळ्यात शेणखताची मात्रा देखील झाडांना दिली जाते. अशा पद्धतीने योग्य नियोजन करून पानेवाडीचे मनोज चव्हाण मोसंबी बागेतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.

‘हे’ झाड लावा आणि झटपट लखपती व्हा! पाहा लागवडीची सोपी पद्धत

योग्य नियोजन करून झाडांची काळजी घ्यावी

इतरही शेतकऱ्यांनी मोसंबी पिकाची लागवड करावी. योग्य नियोजन करून झाडांची काळजी घ्यावी. मोसंबी पिकाचे योग्य व्यवस्थापन केलं तर या पिकातून आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो, असं मनोज चव्हाण यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात