जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalna News : शेतकऱ्याची कमाल, सफरचंद शेती करून दाखवली,यंदा दीड लाखांची कमाई

Jalna News : शेतकऱ्याची कमाल, सफरचंद शेती करून दाखवली,यंदा दीड लाखांची कमाई

Jalna News : शेतकऱ्याची कमाल, सफरचंद शेती करून दाखवली,यंदा दीड लाखांची कमाई

सफरचंद म्हटले की आपल्याला शिमला, जम्मू काश्मीर आठवते. पण जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यानं सफरचंद शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 5 मे : महाराष्ट्रातील शेतकरी शेतीमध्ये आता नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान तसेच सोशल मीडियाचा वापर करून शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग होत आहेत. असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील मठ पिंपळगाव येथील शेतकऱ्याने केला आहे. या गावातील शेतकरी कैलास जिगे यांनी 15 गुंठे क्षेत्रावर 100 सफरचंद झाडांची लागवड करून त्याला यशस्वी फळधारणा करून दाखवलीय. कसा केला जिगे यांनी हा प्रयोग पाहुयात. सफरचंदाची यशस्वी शेती  सफरचंद म्हटले की आपल्याला शिमला, जम्मू काश्मीर आठवते. परंतु, महाराष्ट्रात देखील आता सफरचंदाची यशस्वी शेती होऊ लागली आहे. कैलास जिगे यांनी 15 गुंठे क्षेत्रावर 100 सफरचंदाची झाडे लावली आहेत. ही झाडे आत 25 महिन्याची झाली असून झाडांवर सफरचंदाची फळे लागली आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

कसं केलं नियोजन? काश्मीर मध्ये पिकणारे सफरचंद महाराष्ट्रात देखील काही लोकांनी घेतल्याचे जिगे यांना सोशल मीडियावर समजले. आपण देखील काहीतरी प्रयोग करावा म्हणून त्यांनी बदनापूर येथील एक नर्सरी मधून 100 रोपांची खरेदी केली. लागवड करण्यासाठी त्यांनी हिरामण 99 ही उष्णता सहन करणारी जात निवडली. फेब्रुवारी 2020 मध्ये 10 बाय 12 लागवड केली. वर्षभरातच झाडांना फळे कमी प्रमाणात फळे लागली. दुसऱ्या वर्षी म्हणजेच सध्या या झाडांना चंगल्या प्रकारे फळधारणा झाली आहे.

नेहमीच्या पिकामध्ये चालवलं डोकं, शेतकरी झाला लखपती, Video

एक ते दीड लाख रुपये उत्पन्न अपेक्षित

या झाडांना आपण कोणतेच रासायनिक खत, औषध वापरत नाही. अतिशय कमी पाणी याला लागते. डिसेंबर महिन्यात एकदा याची छाटणी करावी लागते. तर एप्रिल मे महिन्यात फळांची काढणी केली जाते. धुई आल्यामुळे फळधारणा उशिरा झाली. सध्या प्रत्येक झाडावर चार ते पाच किलो माल आहे. आणखी 20 ते 25 दिवसात या फळणाची काढणी होईल. यंदा वातरणात झालेल्या बदलामुळे अपेक्षित फळधारणा झाली नाही. पुढील वर्षी आणखी चांगल्या पद्धतीने नियोजन करून अधिक उत्पन्न काढण्याचा मानस असल्याचे तसेच यंदा यामधून एक ते दीड लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असल्याचे शेतकरी कैलास जिगे यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात