जालना, 27 जुलै : कोरोना व्हायरसनंतर सर्व जग बदलून गेलंय. कोरोना काळात अनेक दिवस संपूर्ण देशाचं कामकाज ठप्प झालं. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. बरेच जण डिप्रेशनचे शिकार झाले. सरकारनं अनेक योजना राबवून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा प्रभाव कमी होऊन आता जवळपास 2 वर्ष झाली आहेत. कोव्हिड काळात सर्वाधिक हाल झालेल्याअकुशल मजूरांची काय परिस्थिती आहे? जालनामधून पाहूया स्पेशल रिपोर्ट काय आहे परिस्थिती? रोज सकाळी 8 ते 12 च्या दरम्यान जालनामधील नाक्यावर 300 च्या आसपास मजूर येतात. यामधील बहुतेक जण शहरातली असली तरी काही जवळच्या गावातील आहेत. बंडू लोखंडे हे मागील 30 वर्षांपासून नाक्यावर कामाच्या शोधात येतात. त्यांनी नाक्यावर यायला सुरुवात केली तेव्हा पुरुषांना 70 तर महिलांना 40 रुपये मजुरी होती. आता 30 वर्षांनी 400 ते 600 रुपये रोजंदारी मिळते. पण, कामात सातत्य नसते, असं लोखंडे यांनी सांगितलं.
आठवड्यातील दोन किंवा तीन दिवस काम मिळते. इतर दिवशी घरीच बसावे लागते. त्यामुळे घर चालवणं कठीण होतं, अशी माहिती लोखंडे यांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात आमच्या सारख्या मजुरांचे खूप हाल झाले. अनेक जण भीक मागायला गेले. त्यांना भीक देखील मिळाली नाही. अनेकदा उपासमार झाली. घरातील अडचणीमुळे काहींच्या बायका घर सोडून माहेरी निघून गेल्या. आजही आमच्याकडे पाहायला कुणालाही वेळ नसल्याची खंत अनिल घायाळ यांनी व्यक्त केलीय. घरातली माणसं सुद्धा बोलत नव्हती पण तृतीयपंथीय माईने करून दाखवलं! एका बिझनेस वुमनची STORY जालना जिल्ह्यातील असंघटित कामगार यांची स्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही कामगार नेते मनोज कोलते यांच्याशी संपर्क साधला. ‘महाराष्ट्र सरकारनं कामगारांसाठी महामंडळाची स्थापना केलेली आहे. ज्यातून कामगारांना शिष्यवृत्ती, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास विमा कवच यांसारख्या सुविधां दिल्या जातात. त्यानंतरही बहुतेक कामगरांची सरकारकडं नोंद नाही. कोरोना काळापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 28 हजार बांधकाम मजूर आहेत. ज्या कामगारांनी आपली नोंद केली नसेल त्यांनी केवळ एक रुपयात आपली नोंदणी करून घेण्याचं आवाहन कोलते यांनी केलंय.