मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! पत्नीला मारहाण केल्याचा संताप, घरमालकाने भाडेकरूला खाली फेकलं

धक्कादायक! पत्नीला मारहाण केल्याचा संताप, घरमालकाने भाडेकरूला खाली फेकलं

धक्कादायक!  भाडेकरूनला अद्दल घडवण्याची घरमालकाचे टोकाचं पाऊल, वरून खाली फेकलं, जालना हादरलं

धक्कादायक! भाडेकरूनला अद्दल घडवण्याची घरमालकाचे टोकाचं पाऊल, वरून खाली फेकलं, जालना हादरलं

धक्कादायक! भाडेकरूनला अद्दल घडवण्याची घरमालकाचे टोकाचं पाऊल, वरून खाली फेकलं, जालना हादरलं

  • Published by:  Kranti Kanetkar
जालना : महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. भाडेकरूला अद्दल घडवण्यासाठी घरमालकाने टोकाचे पाऊल उचललं आहे. घरमालकाने भाडेकरूला वरून खाली फेकल्याची घटना समोर आली. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मृत भाडेकरूच्या पत्नीनं पोलिसांना या प्रकरणी फिर्याद दिली असून घरमालक आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय प्रकरण आकाश पवार आपल्या पत्नी आणि दीड वर्षांच्या सोबत योगेशनगर भागात भाड्याने पहिल्या मजल्यावर राहात होता. पत्नी आणि त्याच्यामध्ये वाद झाला. रागावरचं नियंत्रण सुटलं आणि त्याने पत्नीला बेल्टनं मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नी बचावासाठी ओरडत होती. हा सगळा गोंधळ ऐकून घरमालक नक्की काय घडतंय ते पाहाण्यासाठी पहिल्या मजल्यावर आले. त्यांनी आकाश पवारच्या पत्नीला बाहेर पाठवलं. त्यानंतर घरमालक आणि त्यांची पत्नी देवीचंदसोबत बोलत होती. त्यांच्यात कुरबुरी झाल्या. त्याचं वागणं खटकल्याने त्याला अद्दल घडवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून खाली फेकलं. पती खाली पडल्याचं पत्नीला समजलं. हा सगळा प्रकार धक्कादायक होता. गंभीर जखमी अवस्थेत भाडेकरू आकाशला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती खालवल्याने त्याला औरंगाबाद इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. औरंगाबाद रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पत्नीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून घरमालक आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरमालक तालुका पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त सहायक फौजदार असल्याची माहिती मिळाली आहे. ही धक्कादायक घटना जालना इथल्या योगेशनगर भागात घडल्याची माहिती मिळाली आहे.
First published:

पुढील बातम्या