जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / देशातील पहिलं मधाचं गाव महाराष्ट्रात साकारले जाणार; उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती

देशातील पहिलं मधाचं गाव महाराष्ट्रात साकारले जाणार; उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती

देशातील पहिलं मधाचं गाव महाराष्ट्रात साकारले जाणार; उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती

तुम्ही कधी कल्पना केली आहे की, मधाचंही गाव (Honey Village) असेल. तर हो हे खरं आहे. महाराष्ट्रात देशातील पहिले मधाचं गाव साकारले जाणार आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Minister Subhash Desai) यांनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 11 मे : तुम्ही कधी कल्पना केली आहे की, मधाचंही गाव (Honey Village) असेल. तर हो खरंय. महाराष्ट्रात देशातील पहिले मधाचं गाव साकारले जाणार आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Minister Subhash Desai) यांनी दिली आहे. देशातील महिल्या मधाच्या गावासाठी महाबळेश्वर जवळच्या मांघर या गावाची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणाही मंत्री सुभाष देसाई यांनी केली. राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण संकल्पना आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. काय म्हणाले मंत्री सुभाष देसाई - राज्यातील अनेक गावांची तपासणी केल्यानंतर एका गावाची निवड करण्यात आली. मधाचे गाव साकारण्यासाठी गावाची निवड करणं हा अत्यंत महत्वाचा भाग होता. या गावाची निवड करताना अनेक बाबींची काळजी घेणं आवश्यक होतं. गावाची भौगोलिक रचना, गावातील लोकांचे व्यवसाय, या संकल्पनेसाठी आवश्यक असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती या आणि अशा अनेक बाबींची पुर्तता होणं गरजेचं होतं. मधाचे गाव साकारण्यासाठी महाबळेश्वर येथील मांघर या गावाची निवड करण्यात आली आहे, असे मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. मुख्य कारण काय? मांघर हे गाव महाबळेश्वरपासून 8 किलोमीटर अंतरावर डोंगर कड्याखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. या ठिकाणी वर्षभर सुंदर फुलं फुललेली असतात. या प्रकल्पासाठी याच गावाची निवड करण्याचं मुख्य कारण म्हणजे या गावात सामूहिक पद्धतीने मधमाशांचे संगोपन केले जाते. मांघर या गावातील 80 टक्के लोकसंख्या ही मधमाशापालनाचा व्यवसाय करतात. रोजगार निर्माण करणारा प्रकल्प त्यामुळे मधाचे गाव या उपक्रमांतर्गत या गावात मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्ताने महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. मधाचे गाव हे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या लोकांसाठी कायम स्वरुपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. हेही वाचा -  दहावीत शिकणाऱ्या मुलाने काढलं डॉ.अमोल कोल्हेंचं अप्रतिम चित्र, पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक

मधमाशा या निसर्गातील अन्न साखळीतील महत्वाचा घटक आहेत, असे त्यांच्याकडे पाहिले जाते. तसेच त्यांच्यामुळे पिक उत्पादनातही भरघोस वाढ होत आहे. मधाचे गाव हा अशाप्रकारचा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविला जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात