मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING: आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीच्या घरी आयकर विभागाची छापेमारी, राऊतांच्या पत्रकार परिषदेआधीच मोठी कारवाई

BREAKING: आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीच्या घरी आयकर विभागाची छापेमारी, राऊतांच्या पत्रकार परिषदेआधीच मोठी कारवाई

Income Tax Department Raid: शिवसेना नेते आणि बीएमसीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर आयकर विभागानं आता शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर छापेमारी केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 08 मार्च: मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक राजकीय नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयात ईडी आणि आयकर विभागानं छापेमारी केली आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागानं शिवसेना नेते आणि बीएमसीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant jadhav) यांच्या घरावर छापेमारी केली होती. ही घटना ताजी असताना आता आयकर विभागानं (Income tax department) शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरावर छापेमारी (Raid) केली आहे.

राहुल कनाल हे युवा सेनेचे पदाधिकारी असून शिर्डी मंदिराचं विश्वस्तही आहेत. सध्या छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणी सीआरपीएफ जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज दुपारी 4 वाजता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे एका महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांनाही लक्ष्य करतील, असा अंदाज लावण्यात येत होता. पण ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच प्राप्तिकर विभागानं आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाच्या घरी छापेमारी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शिवसेना नेते आणि शिर्डी येथील साईबाबा मंदिराचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागानं आज सकाळी लवकर छापा टाकला आहे. घराबाहेर कडक सुरक्षा दल तैनात करण्यात आली आहे. राहुल कनाल हे सध्या घरात आहेत की बाहेर, हे अद्याप कळू शकलेलं नाही. राहुल कनाल हे एक व्यापारी असून ते युवा सेनेचे पदाधिकारी देखील आहेत. त्याचबरोबर ते आदित्य ठाकरेंच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहेत.

हेही वाचा-आयकर खात्याच्या मुंबईत 5 ठिकाणी धाडी;अनिल परबांच्या निकटवर्तीयाच्या घरी छापेमारी

दुसरीकडे, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आयकर विभागाच्या या छापेमारीचं समर्थन केलं आहे. ते म्हणाले की, प्राप्तिकर विभाग असो की अन्य कोणतीही तपास यंत्रणा कोणत्याही पुराव्याशिवाय अशी कारवाई करत नाही. आयकर विभागाला राहुल कनाल यांच्याबद्दल नक्कीच महत्त्वाची माहिती मिळाली असावी, ज्याच्या आधारे त्यांनी हा छापा टाकला आहे. अशा परिस्थितीत कनालने आयकर विभागाला सहकार्य करावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Aaditya thackeray, Income tax, Raid