जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalgaon : रावणरुपी प्रशासनाने रामाच्या सीतेचा बळी घेतला, जळगावात धक्कादायक घटना

Jalgaon : रावणरुपी प्रशासनाने रामाच्या सीतेचा बळी घेतला, जळगावात धक्कादायक घटना

Jalgaon : रावणरुपी प्रशासनाने रामाच्या सीतेचा बळी घेतला, जळगावात धक्कादायक घटना

दुर्दैवाने निष्ठुर बनलेल्या रावण रुपी प्रशासनाने रामाच्या सीतेचा बळी घेतला… वेळेवर उपचार न मिळाल्याने सात्री येथील आदिवासी महिला उषाबाई रामलाल भिल हीचा मृत्यू झाला.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदूरकर (जळगाव) 06 ऑक्टोंबर : तिच्या छातीत कळा येऊ लागल्या…लागलीच उलट्याही झाल्या…बोरी नदीला पाणी… घटनास्थळी बोट उपलब्ध नाही… बैलगाडी चालेना… अखेर पारंपरिक पद्धतीने तिला झोळीत टाकले… चार पाच जणांनी कशी बशी नदी पार करून दिली… पण दुर्दैवाने निष्ठुर बनलेल्या रावण रुपी प्रशासनाने रामाच्या सीतेचा बळी घेतला… वेळेवर  उपचार न मिळाल्याने  सात्री येथील आदिवासी महिला उषाबाई रामलाल भिल हीचा मृत्यू झाला.

जाहिरात

सात्री करांसाठी उष:काल होता होता काळ रात्र झाली होती. येरे माझ्या मागल्या प्रमाणे सात्री गावाला स्वातंत्र्यपूर्वीपासून जायला रस्ता नाही, बोरी नदीवर पूल  नाही, गावचे पुनर्वसन झाल्यामुळे शासन विकास करत नाही, पुनर्वविकसित गावचे काम होत नाही. अनेक आंदोलने, अनेक समस्या उद्भाऊन देखील प्रशासन फक्त बैठक आणि तांत्रिक अडचणी दाखवून सात्री ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसत आहेत.

हे ही वाचा :  Mumbai Sea Link Accident : वरळी सी लिंकवरचा ‘देवदूत’ गेला, बचावकार्य सुरू असतानाच भरधाव कारने उडवले

गेल्या वर्षी आरुषी नावाची 11 वर्षीय आदिवासी बालिकेचा उपचाराअभावी  मृत्यू झाला होता. तरीही निष्ठुर प्रशासनाला जाग आली नाही. प्रशासन म्हणते 17 किमीवर अमळनेरला बोट नगरपालिकेत आणून ठेवली आहे. मात्र ग्रामपंचायतीला प्रशासनाने बोट उपलब्ध असल्याचे कळवलेले नाही. 17 किमी वरून बोट आणि कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी किमान दीड तासाच्यावर कालावधी लागतो.

जाहिरात

जळगाव जिल्ह्यातील सात्री गावात उषाबाईला यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या गावाला येण्याजाण्यासाठी रस्ता नव्हता. यामुळे काही लोकांच्या मदतीने तिला झोळीतून नेण्यात आले. ही घटना रात्रीची असल्याने उजाडण्याची वाट पाहिली गेली, दवाखाण्यात नेण्यासाठी नदी पार करायची होती. बैलगाडी पाण्यातून जाऊ शकत नव्हती, गावातील चार पाच लोकांना बोलावले, पारंपरिक पद्धतीने झोळी तयार करून उषाबाईला झोळीत बसवून चार पाच जणांनी नदी पार केली.

जाहिरात

हे ही वाचा :  #कायद्याचंबोला: पर्सनल व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी; घाबरू नका, तुमचं नाव बाहेर न येता होईल बंदोबस्त

तोपर्यन्त बराच कालावधी उलटला होता. अखेर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रावणरुपी निष्ठुर प्रशासनाने रामाच्या सीतेचा बळी घेतला होता. याबाबत ग्रामस्थानी संताप व्यक्त केला.  सात्रीकरांची उष:काल होता होता काळ रात्र झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: jalgaon
  • First Published :
जाहिरात
जाहिरात