मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दिवाळीपर्यंत पाऊस लांबणार? परतीच्या पावसाबाबत हवामान विभागाकडून अलर्ट

दिवाळीपर्यंत पाऊस लांबणार? परतीच्या पावसाबाबत हवामान विभागाकडून अलर्ट

महाराष्ट्रात मुंबई आणि विशेषतः पुण्यात जोरदार पाऊस झाला आहे.

महाराष्ट्रात मुंबई आणि विशेषतः पुण्यात जोरदार पाऊस झाला आहे.

महाराष्ट्रात मुंबई आणि विशेषतः पुण्यात जोरदार पाऊस झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 1 ऑक्टोबर : ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. मात्र, मान्सून अजूनही परत गेलेला नाही. देशातील अनेक भागात पाऊस होत आहे. यातच आता हवामान खात्याने राज्यातील पावसासंदर्भात आणखी एक शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात पुढील 4 ते 5 काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मुंबई आणि विशेषतः पुण्यात जोरदार पाऊस झाला आहे. पुण्यात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. मान्सूनच्या ताज्या हालचालींमुळे हवामान खात्याने देशातील आणखी काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही मान्सून सक्रिय आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 'नोरू' या सुपर चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे नैऋत्य मान्सून देशातून माघार घेण्यास विलंब होणार आहे. मान्सूनला उशीर झाल्याने तो सक्रिय राहील. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

13 ऑक्टोबरनंतर मान्सूनची परतणार -

हवामान खात्याच्या महासंचालकांनी सांगितले की, मान्सूनची माघार 20 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मात्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात असलेल्या हवामान प्रणालीमुळे तो 13 ऑक्टोबरपर्यंत थांबेल. म्हणजेच 13 ऑक्टोबरनंतर मान्सूनचे पुनरागमन होईल. ते पुढे म्हणाले की, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या काही भागात 5 ऑक्टोबरपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Rain updates, Rainfall