मुंबई, 02 सप्टेंबर: मुंबईत (Mumbai Corona Virus) कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका असल्यानं प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्य सरकारने (State Government) तिसऱ्या लाटेची तयारी सुरु केली आहे. अशातच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. सप्टेंबर (September) महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या वाढली तर कडक निर्बंध होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना व्हायरसच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना नाईट कर्फ्यू, संचारबंदी जमावबंदी लागू केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच रुग्णसंथ्या नियंत्रणात येत नसेल तर राज्यात नाईट कर्फ्यूचा लागू करण्याचा पर्यायाचा विचार करण्याची सूचना केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आली होती. यावरही अस्लम शेख यांनी भाष्य केलं आहे. तूर्तास तरी नाईट कर्फ्यू, संचारबंदी, जमावबंदीची गरज नसल्याचं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.
सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचं टास्क फोर्सनं सांगितलं आहे. त्यामुळे मुंबईत रुग्णसंख्या वाढली तर कडक निर्बंध करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन केलं तर निर्बंध लावण्याची वेळ येणार नसल्याचंही ते म्हणालेत. मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसली तर निर्बंध कठोर होणार आहेत. पण सद्यपरिस्थितीत ठिकठिकाणी गर्दी वाढत आहे. अमेरिका, युरोप या देशात कोरोना लसीच्या दोन डोसनंतरही रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचंही अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.