जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मी राजीनामा दिलाच नाही, छिंदमचा घूमजाव

मी राजीनामा दिलाच नाही, छिंदमचा घूमजाव

मी राजीनामा दिलाच नाही, छिंदमचा घूमजाव

अहमदनगर, 09 जून : मी राजीनामा दिलाच नाही असा दावा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यानं केलाय. त्याचबरोबर सुरेखा कदम यांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर करून माझी बनावट सही असलेला राजीनामा देऊन राजकीय षडयंत्रातून मंजूर केल्याचा आरोप केला आहे. भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी फोनवरून बोलताना शिवजयंतीविषयी अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच शिवसेनेनं छिंदम यांच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली आणि त्यांच्या कार्यालयाची मोडतोडही केलीय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    अहमदनगर, 09 जून : मी राजीनामा दिलाच नाही असा दावा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यानं केलाय. त्याचबरोबर सुरेखा कदम यांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर करून माझी बनावट सही असलेला राजीनामा देऊन राजकीय षडयंत्रातून मंजूर केल्याचा आरोप केला आहे. भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी फोनवरून बोलताना शिवजयंतीविषयी अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.  ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच शिवसेनेनं छिंदम यांच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली आणि त्यांच्या कार्यालयाची मोडतोडही केलीय. शिवसेनेसोबतच संभाजी ब्रिगेडही छिंदम यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याने भाजपने शहरातलं वातावरण चिघळू नये, यासाठी छिंदम यांची तात्काळ उममहापौरपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, आता छिंदम याने उपमहापौरपदाचा राजीनामा दिलाच नाही असा दावा केलाय. या आरोपानंतर सेनेच्या माजी शहर प्रमुख आणि महापौर कदम यांचे पती संभाजी कदम यांनी पलटवार केलाय. छिंदम यांचा संबंधित राजीनामा त्याचे राजकीय गुरू खासदार दिलीप गांधी यांनीच महापौर कार्यालयास पाठवला होता, असा दावा केला आहे. छिंदम आणि सेनेतील या आरोप-प्रत्यारोपाने खासदार गांधी अडचणीत आले असून, त्यांची  भूमिका आता उत्सुकतेची असणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात