मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पलंगाखाली मुलीचा तर कपाटात पत्नीचा मृतदेह आढळला अन् पती..., अमरावतीतील कुटुंबाचा दुर्दैव अंत

पलंगाखाली मुलीचा तर कपाटात पत्नीचा मृतदेह आढळला अन् पती..., अमरावतीतील कुटुंबाचा दुर्दैव अंत

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

Crime in Amravati: अमरावतीतील भामोद याठिकाणी एकाच कुटुंबातील (Family) तीन जणांचा संदिग्ध अवस्थेत मृतदेह (3 Suspected deaths) आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Published by:  News18 Desk

अमरावती, 03 जुलै: दर्यापूर तालुक्यातील भामोद याठिकाणी एकाच कुटुंबातील (Family) तीन जणांचा संदिग्ध अवस्थेत मृतदेह (3 Suspected deaths) आढळल्यानं खळबळ उडाली आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्यानं ही घटना उघडकीस आली आहे. मृतकांमध्ये पती-पत्नीसह मुलीचाही (Husband-wife and daughter death) समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी परिसरातील स्थानिक नागरिकांनी घरात डोकावून पाहिल्यानंतर ही घटना समोर आली आहे.

पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीनं गळफास लावून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांकडून लावण्यात येत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. अनिल दिनकर देशमुख (वय-50), वंदना अनिल देशमुख (वय-45) व साक्षी अनिल देशमुख (वय-17) अशी मृत कुटुंबातील सदस्यांची नावं असून सर्वजण भामोद येथील रहिवासी आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानं सर्व कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळपासूनच परिसरात मृत अनिल देशमुख यांच्या घरातून दुर्गंधी सुटली होती. दरम्यान परिसरातील नागरिकांनी घराजवळ जाऊन पाहणी केली. तेव्हा बंद घरातून दुर्गंधी येत असल्याचं निष्पन्न झालं. संशय बळावल्यानं गावकऱ्यांनी येवदा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच येवदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दार तोडून घरात प्रवेश केला. घरातील दृश्य पाहून पोलिसही चक्रावून गेले.

हेही वाचा-कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्या शिक्षिकेनं गमावला जीव; दुचाकी खड्ड्यात अडकली अन्..

घरात पलंगाखाली 17 वर्षीय मुलगी साक्षीचा तर कपाटात पत्नी वंदना यांचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत ठेवल्याचं पोलिसांना आढळून आला. तर पती अनिल यांचा मृतदेह घरातील दुसऱ्या खोलीत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना उघकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. मृत अनिल देशमुख यांनी मुलीची आणि पत्नीची हत्या करून दुसऱ्या खोलीत स्वतः आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. पोलीस नेमक्या कारणाचा शोध घेत असून शेजारील लोकांशी चौकशी केली जात आहे.

First published:

Tags: Amravati, Crime news, Deaths