Home /News /maharashtra /

वांग्याची भाजी संपल्यानं संतापला पती; रॉकेल ओतून पत्नीला पेटवलं, लातूरमधील घटना

वांग्याची भाजी संपल्यानं संतापला पती; रॉकेल ओतून पत्नीला पेटवलं, लातूरमधील घटना

Crime in Latur: लातूर जिल्ह्यातील हेर येथील एका युवकाने वांग्याच्या (Brinjal Curry) भाजीसाठी आपल्या पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून (Husband set wife on fire) दिलं आहे.

    लातूर, 13 जून: नवरा-बायकोमध्ये कधी आणि कोणत्या कारणावरून वाद (Husband wife hassle) होईल, हे काही सांगता येत नाही. लातूर (Latur) जिल्ह्यातील हेर येथील एका युवकाने वांग्याच्या भाजीसाठी (Brinjal Curry) आपल्या पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून (Husband set wife on fire) दिलं आहे. या दुर्दैवी घटनेत आरोपीची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. पीडितेच्या शरीरावर अनेक ठिकाणी भाजलं आहे. पीडित महिलेल्या लातूरमधील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. शादुल शेख असं आरोपी पतीचं नाव आहे. तर गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित पत्नीचं नाव फर्जाना शेख आहे. पत्नी फर्जाना हिने काल सकाळी घरी वांग्याची भाजी केली होती. यावेळी आरोपी पती शादुल आणि फर्जाना यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादामुळे शादुल घरी जेवण न करताच निघून गेला. पण रात्री शादुल दारू पिऊन घरी आला. मद्यधुंद असणाऱ्या शादुलने बायकोला सकाळी केलेल्या वांग्याची भाजी जेवायला मागितली. फर्जाना यांनी वांग्याची भाजी संपल्याचं पतीला सांगितलं. पण शादुलने वांग्याची भाजीच पाहिजे असा हट्ट धरला. यामुळे दोघांत पुन्हा वादाला सुरुवात झाली. पत्नीनं वांग्याची भाजी संपल्याच सांगितल्यानं पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलं. या दुर्दैवी घटनेत पत्नी फर्जाना शेख गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. अवघी हजार-दीड हजार लोकसंख्या असणाऱ्या या हेर गावात या घटनेनं खळबळ उडाली आहे. हे ही वाचा-कारागृहात कपडे धुवायला लावल्याचा घेतला बदला; पुरंदरमध्ये तरुणाचा निर्घृण खून या दुर्घटनेत अतिशय गंभीर भाजलेल्या फर्जाना शेख यांना गावकऱ्यांनी लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. फर्जाना यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती शादूल शेखला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Latur, Wife and husband

    पुढील बातम्या