जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / काळजी घ्या..! दोन दिवस उष्णतेचे; मुंबईसह 'या' शहरांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार

काळजी घ्या..! दोन दिवस उष्णतेचे; मुंबईसह 'या' शहरांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार

काळजी घ्या..! दोन दिवस उष्णतेचे; मुंबईसह 'या' शहरांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार

Maharashtra Heat Wave: सध्या राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 मार्च: सध्या राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर गोवा, कोकण किनारपट्टी (Goa, Konkan coast) आणि उत्तर महाराष्ट्र तापमानाचा (temperature) पारा वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र 17 मार्चनंतरच उन्हाळ्याच्या झळा बसू लागतील, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांत मुंबईसह (Mumbai) राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईसह इतर उपनगरांतही तापमान 40 अंशांपार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमान वाढल्यास मार्च महिन्यात मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. मुंबईसह, पालघर (Palghar), रायगड (Raigad), ठाण्यातही तापमान 42 अंशांपार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर (K. S. Hosaliakr) यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मुंबईत उष्णता वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जाहिरात

होसाळीकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39°C राहील आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता, असल्याचं IMD नं सांगितलं आहे." पुढे ते म्हणाले की, “कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर आणि कमाल तापमान किमान 37°C असावं. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह, राज्यातील पुणे, कोकण, मराठवाडा-विदर्भातही उष्ण तापमान असेल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. या तापमानामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शरीराच्या पाणी पातळीत वाढ करावी आणि काळजी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्यात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात