मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अभिमानास्पद! मराठमोळे हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीच्या वकिलपदावर

अभिमानास्पद! मराठमोळे हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीच्या वकिलपदावर

हरीश साळवेंच्या एका दिवसाच्या कामाचे शुल्क 30 लाखांच्या घरात आहे.

हरीश साळवेंच्या एका दिवसाच्या कामाचे शुल्क 30 लाखांच्या घरात आहे.

हरीश साळवेंच्या एका दिवसाच्या कामाचे शुल्क 30 लाखांच्या घरात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 17 जानेवारी : आतंरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या न्यायमंत्रालयात काऊंसिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतासाठी त्यातही मराठी माणसांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ब्रिटिश सरकारने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार महाराणीने आपल्या न्यायमंत्रालयात 114 वकिलांची 'क्वीन काऊंसिल' म्हणून नियुक्ती केली आहे. वकिली क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांना ही उपाधी दिली जाते. हरीश साळवेंची प्रेरणादायी कारकिर्द हरीश साळवे यांचे नाव केवळ देशातच नाही तर जगातील सर्वात मोठ्या वकिलांमध्ये घेतले जाते. काही अहवालांनुसार त्यांचे एका दिवसाचे कामाचे शुल्क हे 30 लाखांच्या घरात आहे. गेल्या वर्षी हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकिली केली होती. त्याआधी सलमान खान, मुकेश अंबानी, इटली सरकार आणि वोडाफोन सारख्या क्षेत्रातील बड्या  लोकांसाठी काम केले आहे. धुळे जिल्ह्यातील वरुड गावाता जन्म झालेल्या हरीश साळवे  यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले. साधारण 1980 मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. 1992 या वर्षात हरीश साळवे यांची दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९९९ ते २००२ पर्यंत ते देशाला सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहत होते. हरीश साळवे यांचे आजोबा पी.के.साळवे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर होते. तर पणजोबा हे न्यायाधीश होते. हरीश साळवेंच्या वडील एन.के.पी.साळवे हे कॉग्रेसचे नेते होते.
First published:

Tags: Britain queen elizabeth II, Harish salve, Kulbhushan jadhav case, Lawyer, Salman khan case

पुढील बातम्या