जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा धोका! आरोग्य यंत्रणांना अलर्ट; या तीन शहरांवर जास्त लक्ष

कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा धोका! आरोग्य यंत्रणांना अलर्ट; या तीन शहरांवर जास्त लक्ष

कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा धोका!

कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा धोका!

H3 N2 विषाणू संदर्भात आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक पार पडली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 मार्च : कोरोना महामारीनंतर आता H3N2 व्हायरसनेही दहशत वाढवली आहे. व्हायरल तापाने देशाला जणू ग्रासले आहे. H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे देशात मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जानेवारी महिन्यापासून देशात एडेनोव्हायरसचे रुग्णही नोंदवले जात आहेत. दरम्यान अनेक राज्यांमध्ये कोविड-19 संसर्गामध्येही वाढ दिसून आली आहे, अशा परिस्थितीत आता केंद्राने सर्वच राज्यांना अलर्ट दिला आहे. H3 N2 वायरस संदर्भात आज महत्त्वाची बैठक आज पार पडली. यात राज्यातील वैद्यकीय यंत्रणांना सावध राहण्याचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. काय झालं बैठकीत? H3 N2 वायरस संदर्भात आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य मंत्र्यासह अधिकारी उपस्थित होते. यात महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणांना सावध राहणचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. तर सर्वच आरोग्य यंत्रणांना या विषाणूवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. खासकरुन ठाणे, मुंबई आणि पुणे या भागात जास्त लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा प्रसार वाढू नये यासाठी काळजी घ्यावी, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. अद्याप कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलं नाही. वाचा - द्राक्ष खाण्याचे हे फायदे ऐकून थक्क व्हाल, वजन कमी करण्यासोबत मिळते दीर्घायुष्य देशात नवीन साथ? देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्याच्या आणि वाढत्या संसर्गावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासनही देण्यात आले आहे. शात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक दोन दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रुग्णांचं बारकाईने निरीक्षण करावं, असं सांगितलं आहे. तसेच कमी प्रतिकारक क्षमता असलेल्या लोकांनी काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. ज्या जिल्ह्यात रूग्ण आढळले आहेत त्या जिल्ह्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला सूचना करावी, असेही सांगण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona , virus
  • First Published :
जाहिरात
जाहिरात