जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दुपारी कार्यक्रम का ठेवला? उष्माघाताच्या घटनेवर उदय सामंत यांनी स्पष्टचं सांगितलं

दुपारी कार्यक्रम का ठेवला? उष्माघाताच्या घटनेवर उदय सामंत यांनी स्पष्टचं सांगितलं

पालकमंत्री उदय सामंत

पालकमंत्री उदय सामंत

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील उष्माघाताच्या घटनेवर पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

  • -MIN READ Raigad,Maharashtra
  • Last Updated :

रायगड, 17 एप्रिल : आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं. या कार्यक्रमात आलेल्या 13 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, तर काही जणांवर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

..म्हणून कार्यक्रम दुपारी घेतला : उदय सामंत या दुर्दैवी घटनेनंतर अनेकांनी दुपारी कार्यक्रम घेण्यावरुन टीका केली आहे. यावर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. आप्पासाहेब यांना हा पुरस्कार दिला. परंतु, दुर्दैवाने उष्माघातामुळे काही जणांचा मृत्यू झाला. परंतु, विरोधक दुर्दैवाने टीका टिपणी करत आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यायचा होता. मात्र, सर्वांना कार्यक्रम संपवून प्रत्येकाला घरी परतात आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री यांनी हा कार्यक्रम दुपारी ठेवला, असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले आहे. जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न : सामंत रेल्वे स्टेशनं मधून यायला आणि जायला 21 ठिकाणी पार्किंग दिली होती. जास्तीत जास्त सुविधा द्यायचा प्रयत्न आम्ही केला. परंतु, वातावरण बदलले आणि तापमान वाढले. श्री सदस्य यांना आप्पासाहेब यांना पाहायचे होते. श्रद्धेचा विषय होता. त्यामुळे कोणाला अडवणे योग्य नव्हते. मुख्यमंत्री यांनी स्वतः याचा आढावा घेतला होता. मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्य यांना कुटुंबियांना पाच लाख रुपये घोषित केले आहेत. खर्च किती झाला ते आम्ही जाहीर करू. वाचा - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं गालबोट टाळता आलं नसतं का? राज ठाकरेंचा सवाल ही वेळ प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायची नाही. राज ठाकरे यांनी सूचना केल्या आहेत. पण काही जणांनी याचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला. 13 जणांना देवआज्ञा झाली आहे. उष्माघात हा जो प्रकार आहे तो प्रचंड प्रमाणात अचानक उष्णता वाढल्याने होतो. सर्व अधिकाऱ्यांनी श्री सदस्य यांना सुविधा द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला. काहीतरी आपल्याला सापडले आहे आणि या अविरभवातून कोणीही सरकारवर टीका करू नये. मला माहित आहे पाच लाखात त्यांचे नुकसान भरून निघणार नाही, असेही सामंत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: heat
  • First Published :
जाहिरात
जाहिरात