मुंबई, 20 नोव्हेंबर : देशातील सर्वात श्रीमंत परिवारांपैकी एक असेल अंबानी परिवारातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड समूहाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांच्या कन्या इशा अंबानी यांनी जुळ्या बालकांना जन्म दिला आहे. काल 19 नोव्हेंबरला या जुळ्या बालकांचा जन्म झाला.
“आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की आमची मुले ईशा आणि आनंद यांना 19 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वशक्तिमान देवाने जुळ्या मुलांचा आशीर्वाद दिला आहे. ईशा आणि बाळ आदिया आणि बाळ कृष्णा, यांची तब्येत चांगली आहे. आदिया, कृष्णा, ईशा आणि आनंद यांच्या आयुष्यातील या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो,” असे निवेदनात म्हटले आहे.
इशा अंबानी यांचा विवाह हा पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरापल यांचे पुत्र आनंद पिरामल यांच्यासोबत झाला आहे. 12 डिसेंबर 2018 रोजी मुंबईतील अंबानींच्या अल्टामाउंट रोड निवासस्थानी, अँटिलिया येथे या जोडप्याचे लग्न झाले. ईशा आणि आनंद यांनी सप्टेंबर 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली, त्यानंतर त्यांच्या लग्नापूर्वीचा भव्य उत्सव उदयपूरमध्ये थाटामाटात सुरू झाला. याठिकाणी बॉलिवूड आणि राजकारण, व्यवसाय आणि क्रीडा जगतातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
या हाय-प्रोफाईल लग्नाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव आणि फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महान उद्योगपती रतन टाटा, बच्चन परिवार, दिग्गज अभिनेते रजनीकांत, सुपरस्टार आमिर खान, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांसारखे दिग्गज उपस्थित होते.
हेही वाचा - Sundara Manamadhe Bharli: 'माझी सर्वात नावडती व्यक्ती...; अभ्याच्या वाढदिवशी लतीची भन्नाट पोस्ट
या वर्षी ऑगस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी ईशा अंबानीची ओळख रिलायन्स रिटेल व्यवसायाची प्रमुख म्हणून केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mukesh ambani, Reliance group, Reliance Industries Limited