जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पेणजवळच्या नदीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने खळबळ, मुंबई-गोवा हायवे बंद

पेणजवळच्या नदीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने खळबळ, मुंबई-गोवा हायवे बंद

पेणजवळच्या नदीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने खळबळ, मुंबई-गोवा हायवे बंद

पेणजवळ असलेल्या भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या वाहून आल्याचे निदर्शनास आलं आहे.

  • -MIN READ Pen,Raigad,Maharashtra
  • Last Updated :

पेण, 10 नोव्हेंबर : पेणजवळ असलेल्या भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या वाहून आल्याचे निदर्शनास आलं आहे. नदीपात्रात जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मुंबई-गोवा हायवेवरची दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, तसंच घटनास्थळी बॉम्बशोधक पथकही दाखल झालं आहे. गुरूवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. नदीमध्ये जिलेटन कांड्या सापडल्याचं समजताच पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांत विठ्ठल इनामदार,तहसिलदार प्रसाद कालेकर यांनी ताततीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शिवाय पेण तालुक्यातील तिन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनाही तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या जिलेटन कांड्या नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी बॉम्ब शोधक पथकासही पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते. या कांड्या वाहून आल्या की कुणी टाकल्या याबाबत मात्र अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलिसांनी खबरदारी म्हणून मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद केली. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला असतानाच पेणजवळच्या नदीत जिलेटनच्या कांड्या सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणखी अलर्ट झाल्या आहेत. दहशतवादी ड्रोन आणि छोट्या विमानांच्या साह्याने मुंबईत दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याची भीती लक्षात घेता मुंबईत सध्या ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला आयपीसी कलम 188 अंतर्गत शिक्षा केली जाईल. बृहन्मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, दहशतवादी आणि देशद्रोही ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडरचा वापर करून हल्ला करू शकतात आणि व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी हेलिकॉप्टर, हॉट एअर बलूनसह अन्य संशयास्पद गोष्टींच्या वापरावर पुढील 30 दिवस बंदी घालण्यात आली आहे. या काळात फक्त मुंबई पोलीस हवाई पाळत ठेवणार आहेत. हा आदेश 13 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात