गडचिरोली, 11 सप्टेंबर : सध्या राज्यात पावसाचं थैमान सूरू आहे. अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात रात्रीपासुन मुसळधार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणारा राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या पुलाचा जोडरस्ता वाहुन गेल्याने महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागाचा तेलंगणाशी संपर्क तुटला आहे. रस्त्याला भलंमोठं भगदाड पडलं असून याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. तेलंगणाशी संपर्क तुटला राष्ट्रीय महामार्ग 63 वर चेन्नुर या गावालगत तेलंगणाच्या हद्दीत हा पुल महाराष्ट्राच्या हद्दीपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या दोन दिवसांपासून तेलंगणासह सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे बतकाम्मा नाल्यावरील मोठ्या पुलाचा जोडरस्ता वाहुन गेल्याने दोन राज्यांना जोडणारी या महामार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. उल्लेखनीय म्हणजे सिरोंचा तालुक्यातील नागरीकांना हैदराबाद वारंगल या मोठ्या शहरासह तीन राज्यांना जोडणारा महत्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस असल्याने अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या पुलाचा जोडरस्ता वाहून गेला. pic.twitter.com/6oit0BoDjQ
— News18Lokmat (@News18lokmat) September 11, 2022
पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात पाऊस! राज्यात मागच्या महिन्यात दडी मारलेल्या पावसाने राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनापासून जोरदार कोसळायला सुरुवात केली आहे. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Weather Alert Maharashtra) तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान 12 सप्टेंबरपासून निर्देशानुसार मुंबई, ठाण्यासह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले. वाचा - पुण्यात आभाळ फाटलं, ढगफुटीसदृश पाऊस, पाणीच पाणी, पाहा पावसाचे भयंकर VIDEO संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर कमी हवेचे दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. कोकण, मराठवाडा व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातून नैऋत्येकडून तर विदर्भात आग्नेयेकडून वाऱ्याची दिशा आहे. मान्सूनची नैऋत्येकडील व बंगालच्या उपसागराकडील शाखा सक्रिय झाली आहे. नैऋत्य मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल.