महेश तिवारी, भामरागड, 17 ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका राज्याच्या (Gadchiroli Bhamragad Rain) सीमेवरील अतिदुर्गम तालुका आहे. गेले चार दिवस पामुलगौतम आणि पुर्लकोटा नदीला आलेल्या पुराचा भामरागडला फटका बसून चारही बाजूने गावात पुराच पाणी गेले होते. आज काही प्रमाणात पूर ओसरला असला तरी पर्लकोटाचा मोठा पुल पाण्याखालीच आहे, त्यामुळे भामरागडचा संपर्क तुटलेलाच आहे. आज मोबाईल सेवा सुरु झाल्यानंतर भामरागडच्या पूर परिस्थितीची भीषणता दाखवणारे व्हिडिओ समोर आले आहेत. पर्लकोटा नदीचे पाणी समोरुन तर पामुलगौतम नदीचे पाणी मागच्या बाजूने भामरागड मध्ये शिरले होते. गेले चार दिवस मुख्य बाजारपेठेसह भामरागड गावाचा मोठा रहिवासी भाग पुराच्या पाण्याखालीच होता.
2019 ला आलेल्या महापुरानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी भामरागड मध्ये आल्याने जनजीवन ठप्प झाले होते ..उद्या पर्यंत संपूर्ण पुर ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीची तीव्रता समोर येणार आहे. pic.twitter.com/lJ48xQxuw8
— News18Lokmat (@News18lokmat) August 17, 2022
गेले चार दिवस पामुलगौतम आणि पुर्लकोटा नदीला आलेल्या पुराचा भामरागडला फटका बसुन चारही बाजुने आणि गावात पुराच पाणी गेले होते pic.twitter.com/sRodlJObDR
— News18Lokmat (@News18lokmat) August 17, 2022
गेल्या दोन रात्रीत झपाट्याने पूर वाढल्याने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्थानिक यंत्रणेला गावात होडीचा वापर करावा लागला. 300 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. 2019 ला आलेल्या महापुरानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी भामरागड मध्ये आल्याने जनजीवन ठप्प झाले होते. उद्यापर्यंत संपूर्ण पूर ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीची तीव्रता समोर येणार आहे.