अंबरनाथ, 21 ऑक्टोबर : दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना अंबरनाथच्या पालेगावमध्ये घडली आहे. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
पालेगावमध्ये राहणाऱ्या सुरज देसाई आणि कुशल थोरवे यांच्या कुटुंबात रविवारी सकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादानंतर दोन्ही कुटुंबात हाणामारी सुरू झाली. दोन्ही कुटुंबातील महिला पुरुष मुलांनी एकमेकांवर हल्ला चढवत तुंबळ हाणामारी केली. लाठ्या-काठ्यांसह या मारहाणीदरम्यान दगडांचाही वापर करण्यात आल्याने दोन्ही कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.
डोक्यात दगड घातल्याने एक जण जमिनीवर कोसळत असल्याचंही व्हिडिओतून दिसत आहे. या जीवघेण्या हाणामारीमागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
VIDEO : अंबरनाथच्या पालेगावमध्ये दोन कुटुंबात हाणामारी, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/8nHpcnwRny
— News18Lokmat (@News18lokmat) October 20, 2020
जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news