मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

IAS अधिकाऱ्याकडून माजी नगरसेवकाच्या आरोपांवर 5 पानी खुलासा; ठाण्यात उलट-सुलट चर्चांना उधाण

IAS अधिकाऱ्याकडून माजी नगरसेवकाच्या आरोपांवर 5 पानी खुलासा; ठाण्यात उलट-सुलट चर्चांना उधाण

माजी आयुक्तांना एका नगरसेवकाच्या तक्रारीसाठी इतका मोठा खुलासा द्यावा लागला असल्यानं शहरात याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. पत्रामध्ये ठाणे महानगरपालिकेतील गोल्डन गॅंगचा उल्लेख आल्यानं महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे, 11 जून :  एका माजी नगरसेवकाने केलेल्या तक्रारीवर ठाणे महानगरपालिकेचे (Thane Municipal Corporation) माजी आयुक्त संजीव जयस्वाल (Ex Commissioner Sanjeev Jaiswal) यांनी पाच पानी खुलासा दिला आहे. माजी आयुक्तांना एका नगरसेवकाच्या तक्रारीसाठी इतका मोठा खुलासा द्यावा लागला असल्यानं शहरात याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. एकेकाळी ठाण्यातील दबंग अधिकारी आणि झेड प्लस सुरक्षा दर्जा असलेला व्यक्ती एका माजी नगरसेवकाच्या तक्रारीवर मोठा खुलासा देत असल्यानं याची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, या खुलाशामध्ये नेमकं काय म्हटलं आहे, याची माहिती मिळालेली नाही. माजी नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

5 जूनला माजी नगरसेवक संजय घाडीगावकर (Ex corporator Sanjay Ghadigaonkar) यांनी तत्कालीन ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर त्यांची चौकशी सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या पदावरून बदली करून साइड पोस्टिंग केल्याचा राग मनात धरून संजीव जयस्वाल यांनी हा पाच पानी खुलासा केला आहे, असे देखील बोलले जात आहे. तर दुसरीकडे ज्यावेळी संजीव जयस्वाल हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते, त्यावेळेस काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना अभय दिले होते. ते अधिकारी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्या अधिकार्‍यांवर सर्व बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

तसंच त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं आता जयस्वाल यांच्यावर देखील आरोप केले जात आहेत, अशी देखील राजकीय गोटात चर्चा सुरू आहे. तर पाच पानी पत्रात जयस्वाल यांनी पुन्हा परमार प्रकरण बाहेर काढल्यानं ठाणे महानगरपालिकेत राजकारणाला ऊत आला असून आता पुन्हा आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेकीला सुरुवात होण्याती शक्यता आहे.

हे वाचा - पुढच्या आठवड्यात तुमचा जिल्हा Unlock होणार का? पाहा काय आहे सध्याची परिस्थिती

संजीव जैस्वाल यांच्या पत्रामध्ये ठाणे महानगरपालिकेतील गोल्डन गॅंगचा उल्लेख आल्याने महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे. जयस्वाल ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते, त्यावेळेस महानगरपालिकेच्या नगरसेवकांची अनेक गंभीर प्रकरणे जाहीर होत होती. पण, जयस्वाल यांची ठाणे महानगरपालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर महानगरपालिकेतील वातावरण शांत होतं. मात्र, माजी आयुक्तांच्या या खुलाशामुळं ठाणे महानगरपालिकेत प्रशासकीय आणि राजकीय खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Thane, Thane municipal corporation