जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / फडणवीसांचे विश्वासू पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये; मुंबई पोलीस दलात क्रिएट केली नवी पोस्ट

फडणवीसांचे विश्वासू पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये; मुंबई पोलीस दलात क्रिएट केली नवी पोस्ट

फडणवीसांचे विश्वासू पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये; मुंबई पोलीस दलात क्रिएट केली नवी पोस्ट

देवेन भारती यांची 13 डिसेंबर 2022 रोजी ट्रॅफिक जॉइंट कमिशनर असताना बदली झाली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 जानेवारी : मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारचा शासन आदेश काढण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त पदाची पोस्ट नव्हती. पण आता विशेष पोलीस आयुक्त पदाची पोस्ट तयार करण्यात आली आहे. देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात भारती हे शहरातील सर्वात शक्तिशाली आयपीएस अधिकारी होते. त्यानंतर ते लॉ अँड ऑर्डरचे सह आयुक्त झाले. त्यानंतर त्यांना अॅडिशनल डीजीपी म्हणून बढती देऊन दहशतवादविरोधी पथकात हलवण्यात आलं होतं. देवेन भारती यांची 13 डिसेंबर 2022 रोजी ट्रॅफिक जॉइंट कमिशनर असताना बदली झाली होती.त्यांची जागा राजवर्धन यांनी घेतली होती.तेव्हापासून ते एटीस प्रमुख विनीत अग्रवाल, ठाणे येथील सीपी बिपिन कुमार सिंह आणि एसीबीचे अॅडिशनल डीजी प्रभात कुमार यांच्याबरोबर भारती हेही नवं पोस्टिंग मिळण्याची प्रतीक्षा करत होते. देवेन भारती यांचे अधिकार आणि कामाचे स्वरूप - प्रशासकीय निकड म्हणून पोलीस आयुक्त, बृहनमुंबई, यांच्या अधीपत्याखाली पोलीस सहआयुक्तांच्या कामावर अविक प्रभावीपणे पर्यवेक्षण करण्यासाठी, “अपर पोलीस महासंचालक” दर्जाच्या पदाची आवश्यकता विचारात घेऊन, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील “सुंचालक, सुरक्षा व अंमलबजावणी” हे “अपर पोलीस महासंचालक” दर्जाचे पद, पोलीस आयुक्त, बृहनमुंबई, यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या पदाचे नामाभिदान “विशेष पोलीस आयुक्त” असे करण्यास शासन मान्यता देत आहे. विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, हे पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखाली सर्व पोलीस सह आयुक्तांच्या कामाचे सनियंत्रण आणि पर्यवेक्षण करतील. हा शासन निर्णय महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 5 अन्वये शासनास प्राप्त अधिकारांचा वापर करुन निर्गमित करण्यात येत आहे. हेही वाचा -  Deven Bharti Mumbai Police : फडणवीसांच्या निकटवर्ती यांना मुंबईत मोठी संधी? केली special पदाची निर्मिती विशेप पदावर नियुक्तीबाबत शासनाच्या आदेशात काय - महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) च्या कलम 5 अन्वये, उक्त अधिनियमातील तरतुदींच्या अधीन, राज्य शासनास, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे, पोलीस दलात विविध दर्जाची व संख्येने पदे, त्यांची कर्तव्ये व कार्य आणि अधिकार निर्धारित करण्याचे अधिकार आहेत. तसेच, उक्त अधिनियमातील कलम 7 अन्वये एखादा पोलीस अधीकारी यास पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त नियुक्त करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत. अशा अधिकाऱ्याने पार पाडावयाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, वापर करावयाचे अधिकार, इत्यादी निर्धारित करण्याचे अविकार हे, पोलीस महासंचालकांच्या अधीन पोलीस आयुक्त यांना आहेत. पोलीस आयुक्त, बृहनमुंबई, यांच्या अधिपत्याखाली पोलीस सह आयुक्तांच्या कामावर अधिकारी प्रभावीपणे पर्यवेक्षण करता यावे म्हणून त्यांच्या अधीन विशेष पोलीस आयुक्त हे “अपर पोलीस महासंचालक” दर्जाचे पद सुपूर्त करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्या अनुसार शासनाने निर्णय घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात