मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अचानक सुरु झाला विद्युत प्रवाह अन् शॉक लागून पिता-पुत्राचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू

अचानक सुरु झाला विद्युत प्रवाह अन् शॉक लागून पिता-पुत्राचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू

मैराळ पिता-पुत्र सकाळीच धरणाच्या बॅक वॉटरमध्ये टाकलेली मोटार सरकवण्यासाठी धरणावर गेले होते.

मैराळ पिता-पुत्र सकाळीच धरणाच्या बॅक वॉटरमध्ये टाकलेली मोटार सरकवण्यासाठी धरणावर गेले होते.

मैराळ पिता-पुत्र सकाळीच धरणाच्या बॅक वॉटरमध्ये टाकलेली मोटार सरकवण्यासाठी धरणावर गेले होते.

  बुलडाणा, 17 मे: लोणार तालुक्यातील हिरडव येथील पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धरणावरील मोटारीचा विद्यूत शॉक लागून पिता-पुत्राचा जागेवरच मृत्यू झाली. 17 मे रोजी सकाळी 7 वाजेदरम्यान ही घटना घडली. जनार्धन निवृत्ती मैराळ (वय-50) व निलेश जनार्धन मैराळ (वय-34) असं मृत पितापुत्राचं नाव आहे.

  हेही वाचा.. मोठी बातमी! महाराष्ट्रात 31 मेपर्यंत LOCKDOWN वाढवला, जाणून घ्या कसा चौथा टप्पा

  मैराळ पिता-पुत्र सकाळीच धरणाच्या बॅक वॉटरमध्ये टाकलेली मोटार सरकवण्यासाठी धरणावर गेले होते. दोघे पाण्यातील मोटार सरकावत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाला आणि दोघांना जबर झटका बसून जागेवर पिता-पुत्राचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. हिरवड गावावर शोककळा पसरली आहे.

  घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस कॉन्स्टेबल सुरेश काळे, दीपक केसकर पंचनामा करुन दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. दरम्यान, पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड कायम सुरु असते. आता हीच धडपड शेतकरी पिता-पुत्राच्या जिवावर बेतली आहे.

  हेही वाचा.. धक्कादायक! औरंगाबाद जेलमध्ये लघुशंकेला उठलेल्या तरुण कैद्यासोबत अनैसर्गिक कृत्य

  दुसरीकडे, पित्याची मुलासह नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आली आहे. पाच वर्षाच्या पोटच्या चिमुकल्या मुलासह पित्याने टाकळी येथील भीमा नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली.

  नागराज सिद्रामप्पा कनाळे (वय- 47) व समर्थ नागराज कनाळे (वय 5) हे पिता-पुत्र सोलापुरातील भवानी पेठ परिसरात राहणारे आहेत. झळकी (ता. इंडी) पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

  हेही वाचा... मुलीकडे अचानक मोबाइल आला कसा? वडिलांनी जाब विचारताच जेवणात कालवलं विष!

  First published:
  top videos