Home /News /maharashtra /

जिलेटिन केपच्या वायरला मोबाईल बॅटरी जोडून घडवला स्फोट, शाळकरी मुलाची झाली भयंकर अवस्था

जिलेटिन केपच्या वायरला मोबाईल बॅटरी जोडून घडवला स्फोट, शाळकरी मुलाची झाली भयंकर अवस्था

Explosion News Sangali: सांगलीतील एका शाळकरी मुलाने जिलेटीन केपच्या वायरला मोबाईलची बॅटरी जोडून (Mobile Battery) भयानक स्फोट (Explosion) घडवला आहे. त्या दुर्घटनेत संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

सांगली, 27 फेब्रुवारी: आठवीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलाला (School Boy) मस्करीत जिलेटीनच्या (सुरुंग) कांड्याशी खेळणं चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित मुलाने जिलेटीन केपच्या वायरला मोबाईलची बॅटरी जोडून (Mobile Battery) भयानक स्फोट (Explosion) घडवला आहे. या अपघातात करण तुकाराम येसले हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी (Injury) झाला आहे. त्याला उपचारासाठी कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना सांगलीच्या शिराळा तालुक्यातील येसलेवाडी येथील आहेत. संबंधित जखमी करण येसले गुरुवारी आपल्या काही मित्रांसोबत माळरानावर खेळायला गेला होता. यावेळी संध्याकाळी त्याला माळरानावर खेळत असताना, गावाशेजारील एका झुडुपात त्याला जिलेटीनच्या काही कांड्या दिसल्या. त्याने त्या कांड्या घरी घेवून आला. त्यानंतर सायंकाळी आठच्या सुमारास ही सर्व मुलं पुन्हा एकत्र कट्टयावर जमली होती. यावेळी जिलेटीन कॅपच्या दोन तारांना मोबाईलची बॅटरी जोडल्यानंतर काय होऊ शकतं, हे पाहण्यासाठी करणने गंमतीने मोबईलची बॅटरी जिलेटीन कॅपच्या दोन्ही तारांना जोडली. यावेळी अचानक धडकी भरवणारा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, करण येसले या शाळकरी मुलाच्या जबडयाला जबरदस्त इजा झाली आहे. जखमी करणच्या जबड्याच्या वरच्या बाजुचे दात तुटून गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय जवळ बसलेल्या इतर मुलांनाही कमी जास्त प्रमाणात जखमा झाल्या आहेत. हे ही वाचा-अमानुष; महिलेनं पतीला टेम्पोला बांधून एक किलोमीटर फरफटत नेलं, घटना CCTVमध्ये कैद करण तुकाराम येसले हा येसलेवाडी येथील कमला माधव विद्यालयात शिकतो. तो सध्या इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. त्याची ही गंमत खुपच महागात पडली आहे. करण्च्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून आई वडील मोलमजुरी करतात. त्याच्यावर सध्या कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Gelatin explosives, Maharashtra, Mobile Phone, Sangali

पुढील बातम्या