Home /News /maharashtra /

Exit Poll 2019 : सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव, न्यूज 18 च्या सर्व्हेचा अंदाज

Exit Poll 2019 : सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव, न्यूज 18 च्या सर्व्हेचा अंदाज

सोलापूरमध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा पराभव होईल आणि ही जागा भाजपला मिळेल, असा न्यूज 18 च्या सर्व्हेचा अंदाज आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे इथली लढत तिरंगी होती.

    सोलापूर,21 मे : सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि दोनदा खासदार राहिलेले सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्याऐवजी जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेही अकोल्यासोबतच सोलापूरमधूनही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे इथली लढत तिरंगी आहे. सुशीलकुमार शिंदेंचा इथे पराभव होईल आणि ही जागा भाजपला मिळेल, असा न्यूज 18 च्या सर्व्हेचा अंदाज आहे. सुशीलकुमार शिंदेंचा मतदारसंघ सोलापूरची जागा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. 1971 पासून ही जागा काँग्रेस किंवा भाजप या दोन्ही पक्षांकडे राहिली आहे. सोलापूरमधल्या लिंगायत मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने लोकसभा निवडणुकीत धार्मिक गुरू जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांना रिंगणात उतरवलं, असं बोललं जातं. सोलापूरमध्ये लिंगायत आणि दलित मतदारांची संख्या जास्त आहे. वंचित फॅक्टर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमधून आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर इथली गणितं बदलली. प्रकाश आंबेडकर हे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही उमेदवारांना टक्कर देऊ शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मोदी लाटेत जागा भाजपकडे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे यांचा विजय झाला आणि सोलापूरची जागा सुशीलकुमार शिंदेंच्या हातून गेली. शरद बनसोडे यांनी सुशीलकुमार शिंदेंचा दणदणीत पराभव केला होता. त्याच वेळी इथे बसपा आणि आम आदमी पार्टीनेही निवडणूक लढवली होती. सोलापूरमध्ये मोहोळ विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे तर सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट आणि पंढरपूर या विधानसभा जागा काँग्रेसकडे आहेत. सोलापूर शहर दक्षिण आणि उत्तर या दोन विधानसभेच्या जागा भाजपकडे आहेत.
    First published:

    Tags: Solapur S13p42, Sushilkumar shinde

    पुढील बातम्या