हिंगोली, 2 फेब्रुवारी : विदर्भ-मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांच्या आकाशात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आकाशातून पाच गोळे एकाच रांगेतून जाताना नागरिकांनी बघितले. आकाशातून जाणाऱ्या या वस्तू नेमक्या काय आहेत? याबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. आकाशातून उडत जाणाऱ्या या वस्तू पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. परग्रहावरून एलियन तर आले नाहीत ना? याची चर्चाही नागरिक करत होते.
मराठवाड्याच्या हिंगोली, विदर्भातल्या बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आकाशात चमकणाऱ्या या वस्तू दिसल्या. दरम्यान एलन मस्क यांच्या 55 सॅटलाईनच्या स्कायलिंकची ही ट्रेन असावी, अशी चर्चा सुरू आहे. खगोलशास्त्रज्ञांमध्ये याबाबत कुतूहल आहे.|
संध्याकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी नागरिकांनी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी एक वस्तू बघितली. यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. लोकांना धुमकेतू, उल्का किंवा आकाशातून पडलेल्या सॅटलाईटचे तुकडे असावेत, असं वाटलं.
आकाशातून गेलेल्या त्या वस्तूला स्पेस-एक्स असं म्हणतात. हे स्टारलिंक सॅटलाईट्स आहेत. जगातून अनेक ठिकाणी हे दिसतात. 2019 मध्ये याची सुरूवात झाली. इंटरनेट प्रोव्हायडर म्हणून हे सॅटलाईट्स कामाला येतात. 55 सॅटलाईट्सची ती मालिका होती. एकामागोमाग एक हे सॅटलाईट्स जातात, असं खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.