बीड, 24 मार्च : व्यसनमुक्ती केंद्रात व्यसन कमी होण्याऐवजी वाढल्याने संतापलेल्या दोघांनी व्यसनमुक्ती केंद्राची तोडफोड केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. शहरात नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असताना दोन महिने छळ झाल्याचा आरोप दोघांनी केलाय. यामुळे दारूचे व्यसन कमी न होता दोघेही दारू जास्त प्यायला लागलो असा त्यांनी दावा केलाय. याच रागातून दारू पिऊन दोघांनी व्यसनमुक्ती केंद्रावर दगडफेक केली.
दारू पिऊन दोघांनी घातलेल्या गोंधळात व्यसनमुक्ती केंद्राची काच, विद्युत मीटर फुटले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांनी पोलिसांनी आपला व्यसनमुक्ती केंद्रात छळ झाल्याचा आरोप केला.नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र याआधीही चर्चेत आलं होतं.
महिला डॉक्टरकडे केलेली शरीरसुखाची मागणी
वाघाळा इथल्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात एका महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी बोगस वैद्यकीय पदवी असणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोग्य विभागाने वाघाळा, केज, बीड आणि मोरेवाडी इथल्या शाखांवर छापा टाकला होता. यावेळी ७५ जणांची सुटका करण्यात आली होती. तसंच मुदत संपलेली औषधेही जप्त केली होती. आता केंद्रातून सुटका झालेल्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed