मला हिंदूहृदयसम्राट म्हणणे बंद करा, राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी

मला हिंदूहृदयसम्राट म्हणणे बंद करा, राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित करण्यात आली होती

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी : मला हिंदूहृदयसम्राट म्हणणे बंद करा, आपण बाळासाहेबांची जागा घेवू शकत नाही, अशी सुचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली. मनसेच्या 9 फेब्रुवारीला होणाऱ्या मोर्चासंदर्भात आज रंगशारदा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासाठी राज ठाकरे उपस्थित राहिले होते. मात्र तब्येत ठीक नसल्याचे सांगत पाच मिनिटात राज ठाकरे बाहेर पडले. पुढील बैठक ही मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु राहील. मनसेच्या मोर्चाची जोरदार तयारी करा, सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या दिव्य अशा झेंड्याची काळजी घ्या, त्याचा अपमान होता कामा नये अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उशिरा आले होते. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर केवळ 10 मिनिटांतच ते रंगशारदामधून बाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. आज रंगशारदामध्ये मनसेची महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शॅडो कॅबिनेट आणि 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मोर्चासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, शॅडो कॅबिनेटसंदर्भात निर्णय घेण्यात आला की नाही याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र राज ठाकरे अचानक रंगशारदामधून बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शॅडो कॅबिनेट म्हणजे नेमकं काय?

- विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला 'शॅडो कॅबिनेट' म्हणतात.

- अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीत कॅबिनेट पद्धतीला सुरुवात

- कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे 15 ते 20 मंत्री

- राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो

- काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मात्र 33 मंत्र्यांचा समावेश

- त्यामुळे मनसेच्या प्रत्येक नेत्याकडे दोन-दोन मंत्र्यांची जबाबदारी ​

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2020 01:27 PM IST

ताज्या बातम्या