भिवंडी, 15 सप्टेंबर : आपल्या सगळ्यांच्या घरी रोज दूध येतं, पण आपल्या घरी येणारं हे दूध नेमकं कसं येतं? हे अनेकांना माहिती नसतं. भिवंडीमधला असाच एक किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दुधाच्या कॅनमधलं दूध भटके कुत्रे पित असल्याचं दिसत आहे. एका इमारतीच्या बाहेर दुधाचे कॅन ठेवलेले असताना तीन कुत्री तिकडे येतात. यातला एक कुत्रा दुधाच्या कॅनमध्ये तोंड घालून दूध पित आहे. तर दुसरा कुत्रा आपला नंबर कधी येईल, याची वाट पाहत आहे. या कॅनमधलं दूध किती जणांच्या घरी गेलं असेल, याची कल्पना न केलेलीच बरी.
या व्हिडिओबाबत जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार हा व्हिडिओ भिवंडीचा असल्याचं कळतंय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता प्रशासन या दूध विक्रेत्यावर कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.