जळगाव, 15 डिसेंबर : जळगाव शहराला लागून असलेल्या खेडी शिवारातील एका हॉटेल महेंद्र(ढाबा) येथे रविवारी रात्री भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि जळगावचे माजी नगरसेवक सुनील माळी यांचे बंधू मुकेश माळी या दोघांच्या गटात किरकोळ वादातून चांगलाच राडा झाला.
यावेळी अनिल चौधरी यांच्या एका समर्थकांनी पिस्तूल काढल्यामुळे घटनास्थळी जबरदस्त तणाव निर्माण झाला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनील छबीलदास चौधरी यांच्या समर्थकांने ढाब्यावर एकाला रिव्हॉल्वर लावत धिंगाणा घातला. समोरच्या गटातील मुकेश माळी हा जळगावचे भाजपचे माजी नगरसेवक सुनील माळी यांचे बंधु असून दोन्ही गट किरकोळ गोष्टीतून समोरा-समोर आल्याने रविवारी महिंद्रा ढाब्यावर वाद विकोपाला गेला हेाता.
रात्री उशिरा दोन्ही गटाने आपसांत समझोता घडवून आणल्यावर वाद मिटला. पोलिसांना घटनेची माहिती माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अनिल चौधरी, नगरसेवक भगत बालाणी यांच्यासह दोन्ही बाजूच्या एकूण 10 जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, अनिल चौधरी हे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जवळचे मानले जातात तर सुनील माळी हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.