जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / परीक्षा SSC ची पण पेपर CBSE चा, धाराशिवच्या शरद पवार स्कूलमध्ये गोंधळ, मुलांनी तक्रार केली, पण...

परीक्षा SSC ची पण पेपर CBSE चा, धाराशिवच्या शरद पवार स्कूलमध्ये गोंधळ, मुलांनी तक्रार केली, पण...

दहावीच्या परीक्षेला सीबीएसईचा पेपर

दहावीच्या परीक्षेला सीबीएसईचा पेपर

धाराशिव शहरातल्या शरद पवार हायस्कूल या परीक्षा केंद्रावर दहावीचा चुकीचा पेपर वाटला गेला आहे.

  • -MIN READ Osmanabad,Maharashtra
  • Last Updated :

धाराशिव, 6 मार्च : धाराशिव शहरातल्या शरद पवार हायस्कूल या परीक्षा केंद्रावर दहावीचा चुकीचा पेपर वाटला गेला आहे. मराठी माध्यमांच्या मुलांना सीबीएसई पॅटर्नचा इंग्रजीचा पेपर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतरही बळजबरीने आम्हाला सीबीएसईचाच पेपर लिहायला लावला, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. हा गोंधळ झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थी अजून परीक्षा केंद्रावरच थांबून आहेत. प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आज दहावीचा इंग्रजीचा पेपर होता, पण विद्यार्थ्यांना सीबीएसईचा इंग्रजीचा पेपर मिळाल्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी चौकशी सुरू असल्याचं सांगत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. याआधी महाराष्ट्रात काही ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षांवेळी कॉपीच्या घटनाही समोर आल्या आहेत. यातल्या काही ठिकाणी तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पालकच त्यांना कॉपी पुरवत असल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. कॉपीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी यावेळी बोर्डाने 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका द्यायचा निर्णय रद्द केला, त्याऐवजी विद्यार्थ्यांना उत्तरं लिहिण्यासाठी शेवटची 10 मिनिटं जास्त देण्यात येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ssc board
  • First Published :
जाहिरात
जाहिरात