जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंडे, विलासराव, भुजबळ आणि खडसे, अनलकी 'रामटेक' यावेळी शिंदेंच्या या शिलेदाराला!

मुंडे, विलासराव, भुजबळ आणि खडसे, अनलकी 'रामटेक' यावेळी शिंदेंच्या या शिलेदाराला!

मुंडे, विलासराव, भुजबळ आणि खडसे, अनलकी 'रामटेक' यावेळी शिंदेंच्या या शिलेदाराला!

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मंत्र्यांच्या बंगल्यांच वाटपही जाहीर झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक चर्चेत असलेला रामटेक बंगला (Ramtek Bungalow) हा शिंदेंच्या मंत्र्याला मिळाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑगस्ट : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मंत्र्यांच्या बंगल्यांच वाटपही जाहीर झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक चर्चेत असलेला रामटेक बंगला (Ramtek Bungalow) हा दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना देण्यात आला आहे. 8,857 स्क्वेअर फूट असलेल्या या एक मजली बंगल्यामध्ये 5 बेडरूम आहेत, यातल्या 3 तळ मजल्यावर आणि 2 पहिल्या मजल्यावर आहेत. याशिवाय बंगल्यात हॉल, लिव्हिंग रूम, डायनिंग हॉल, कार्यालय, बैठकीसाठी हॉल या सुविधाही आहेत. मलबार हिल आणि नरीमन पॉईंटवर असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यापैकी रामटेक हा एकमेव बंगला समुद्र किनाऱ्यासमोर आहे. रामटेक हा बंगला एवढा आलिशान असला तरी शरद पवार वगळता हा बंगला दुसऱ्या कोणासाठीच लकी ठरला नाही, असं म्हणतात. 1978 साली शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं, त्यावेळी शरद पवार याच बंगल्यात राहत होते. यानंतर मात्र या बंगल्यात राहणाऱ्या मंत्र्यांना अडचणीला सामोरं जावं लागलं. विलासराव देशमुख विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) रामटेक बंगल्यामध्ये राहत असतानाच 1995 साली लातूरमधून त्यांचा पराभव झाला. जनता दलाच्या शिवाजीराव पाटील कवहेकर यांनी विलासरावांना मात दिली. यानंतर विलासरावांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा प्रयत्न झाला, पण या निवडणुकीत त्यांचा फक्त अर्ध्या मताने पराभव झाला. अखेर 1999 साली विधानसभा निवडणुकीत विलासरावांना विजय मिळवला. गोपीनाथ मुंडे 1995 सालच्या पराभवानंतर विलासरावांना रामटेक बंगला सोडावा लागला, यानंतर गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) या बंगल्यात राहायला आले. शिवसेना-भाजपचं सरकार आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री करण्यात आलं. मुंडेंनी वास्तू शास्त्रानुसार बंगल्यामध्ये काही बदलही केले, पण दोनच वर्षात ते वादात सापडले. 1999 साली शिवसेना-भाजपचं सरकार गेल्यानंतर मुंडेंना रामटेक बंगला सोडावा लागला. छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर छगन भुजबळ (Chagan Bhujbal) रामटेक बंगल्यामध्ये राहायला आले. रामटेकमध्ये राहायला आल्यानंतर चार वर्षांनी भुजबळ यांचं नाव तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात आलं, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर भुजबळ रामटेकमध्येच राहत होते. यानंतर 2004 साली त्यांची पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागली. यानंतर 2014 पर्यंत भुजबळ मंत्री राहिले, पण मार्च 2016 साली त्यांना ईडीने महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली. एकनाथ खडसे 2014 साली सत्ता गेल्यानंतर भुजबळांनाही रामटेक बंगला सोडावा लागला. यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) या बंगल्यात राहायला आले. 2014 साली राज्यात पहिल्यांदाच भाजपचं सरकार आल्यानंतर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते, पण 2016 साली भोसरी एमआयडीसी जमिन गैरव्यवहाराचा आरोप झाल्यामुळे खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात